Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २७ मे २०२२: धनलक्ष्मी प्रसन्न राहील; उत्तमोत्तम संधींचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-05-27 07:51:43 | Updated: May 27, 2022 07:51 IST

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. काहींना भेटवस्तू मिळतील. अडचणी दूर होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.  

वृषभ: आर्थिक आवक चांगली राहील. मात्र, अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. चैन करण्यावर खर्च करण्याकडे कल राहील. काहींना प्रवास करावा लागेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम बाळगावा. जीवनसाथीच्या सल्ल्याने वागणे योग्य ठरेल. 

मिथुन: धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. अनेकविध मार्गांनी पैसे मिळतील. भेटवस्तू मिळतीलय चांगले प्रवास होतील. लोक सहकार्य करण्यासाठी पुढे येतील एखाद्या तऱ्हेवाईक व्यक्तीच्या वर्तणुकीचा त्रास होऊ शकतो. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. 

कर्क: ग्रहमान तुम्हाला अनुकूल राहील. नोकरीत चांगल्या प्रकारचे बदल होतील. काहींना अपेक्षित बदली मिळेल. नवीन संधी फायदेशीर राहील. नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर संधी मिळेल. मुले प्रगती करतील. घरी पाहुणे येतील. आर्थिक आवक चांगली राहील. 

सिंह: दगदग, धावपळ कमी होईल. कायद्याची बंधने पाळा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमचे महत्त्व वाढेल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. आर्थिक आवक ठिकठाक राहील. तुमचा नावलौकिक वाढेल.

कन्या: संमिश्र ग्रहमान राहील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. वाहन जपून चालवा. वेगावर मर्यादा ठेवा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. 

तूळ: नोकरीत अडचणी दूर होतील. एखादी चांगली संधी मिळेल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. प्रवासाचे योग येतील. व्यवसायात चांगली विक्री होईल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. भेटवस्तू मिळू शकतात.

वृश्चिक: महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या. कामे आटोक्यात आणण्यासाठी अट्टाहास करू नका. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. जीवनसाथीची काळजी घ्या. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. 

धनु: अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. 

मकर: नोकरीत चांगली परिस्थिती राहील. मात्र कामाचा ताण राहील. घरी पाहुणे येतील. घर आणि नोकरी यांचा समतोल साधताना ओढाताण होईल. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. मनासारखे भोजन मिळेल. आर्थिक उलाढाली जपून करा.

कुंभ: नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. बढतीसाठी प्रयत्न करत असाल तर यश मिळेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगली परिस्थिती राहील. आवडते पदार्थ ताटात दिसतील. व्यवसायात बरकत राहील.

मीन: मुलांना अचानक चांगली संधी मिळेल. त्यातून त्यांचा फायदा होईल. धनलाभ होईल. जीवनसाथीच्या कलाने घ्या. भावंडांना मदत करावी लागेल. कामात सफलता मिळेल. मालमत्तेच्या व्यवहारात सावधानता बाळगा.

- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)
 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App