मेष: संमिश्र ग्रहमान राहील. आर्थिक आवक चांगली राहील. खर्चाचे प्रमाण देखील वाढते राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. त्यासाठी पैसे खर्च कराल. अचानक एखादा खर्च उद्भवू शकतो. महत्त्वाचे काम सायंकाळ होण्याच्या आत पूर्ण करून घ्या.
वृषभ: आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत कामाचा ताण राहील. चुका होणार नाहीत, याची काळजी घ्या. एखादी चांगली घटना घडेल. महत्त्वाचे निरोप येतील. वडीलधाऱ्या मंडळींचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. बऱ्याचदा त्यातून चांगल्या टीप्स मिळतात.
मिथुन: धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. मात्र, कुणी तुम्हाला फसवणार नाही याची काळजी घ्या. डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवू नका. व्यवसायात कामे गती घेतील. घरात सदस्यांशी समन्वय राहील. घरी पाहुणे यातील. नोकरीत अनुकूल घटना घडतील.
कर्क: नवीन कार्यक्षेत्राशी ओळख होईल. जे लोक नोकरीच्या शोधात असतील त्यांना मनासारखे काम मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. तुमचे म्हणणे इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक आवक चांगली राहील.
सिंह: थोरा-मोठ्यांच्या सहवासात याल. त्याचा फायदा होईल. नोकरीत तुमची बाजू बळकट राहील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. ओळखीचा फायदा होईल. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
कन्या: एखाद्या व्यवहारात चांगला फायदा होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुणाचे मन दुखावले जाईल असे बोलू नका. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. मनात आनंदी विचार राहतील.
तूळ: व्यवसायात विक्री चांगली होईल. योग्य सल्ला मिळेल. एखादी व्यक्ती अपेक्षाभंग करू शकते. जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. कायद्याची बंधने पाळा. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आपली गोपनीय माहिती लोकांना सांगण्याचा मोह आवरला पाहिजे.
वृश्चिक: सरकारी कामात यश मिळेल. मनावरील दडपण निघून जाईल. व्यवसायात जपून व्यवहार करा. कामात चोख राहा. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नवीन क्षेत्रात संधी मिळू शकते. प्रवासाचे योग येतील. प्रवास कार्य साधक ठरतील.
धनु: व्यवसायात उधारीवर माल देताना विचार करून द्या. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी वेळ द्याल. एखादी नवीन कल्पना राबवाल. घरी लोकांची ये-जा राहील. एखाद्या व्यवहारात मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.
मकर: जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. वडीलधाऱ्या मंडळींचे ऐकून घ्या. जीवनसाथीशी सूर जुळतील. मनात आनंदी विचार राहतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल. जवळचे लोक भेटतील.
कुंभ: व्यवसायात विक्री चांगली होईल. एखाद्या व्यक्तीबद्दल असलेले गैरसमज दूर होतील. कुणाला दुखावू नका. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. पूर्वी घेतलेल्या कामांचा फायदा होईल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.
मीन: नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. त्यामुळे आर्थिक फायदा होईल. लोकांच्या भेटीगाठी होतील. जनसंपर्क वाढेल. एखाद्या नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.
- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)