आजचे राशीभविष्य - 25 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, प्रलंबित कामे पूर्ण होतील

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-05-25 07:13:15 | Updated: May 25, 2023 07:13 IST

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष- नोकरीत तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. नवीन संधी खुणावतील, वरिष्ठांकडून मदत व मार्गदर्शन मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील. करमणुकीच्या कार्यक्रमात भाग घ्याल.

वृषभ- विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. नातेवाइकाची ख्यालीखुशाली कळेल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. विविध मार्गानी धनप्राप्ती होईल. मनोरंजन, समाजसेवा यासाठी वेळ व पैसा खर्च कराल.

मिथुन- ग्रहमानाची चांगली साथ तुम्हाला राहील. त्यामुळे कमी प्रयत्नात जास्त प्रमाणात यश मिळेल. कामात उत्साह राहील. व्यवसायात भरभराट होईल. धनप्राप्तीचे योग आहेत. मालमत्तेच्या कामात मनासारखे यश मिळेल. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल.

कर्क- हाती घ्याल ते तडीस न्याल, अशी परिस्थिती राहील. त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. मोठ्या योजना आखल्या जातील. लोकांचे चागले सहकार्य मिळेल. तरुण वर्गाला आनंददायक बातम्या कानावर पडतील. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील.

सिंह- अनुकूल काळाचा फायदा उचलला पाहिजे. कटू आठवणीना दूर करून नवीन संधीचा शोध घ्या. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. थोरा-मोठ्यांच्या ओळखीचा फायदा होईल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील.

कन्या- आर्थिक आवक चांगली राहील. तुमच्या हाताला यश येईल. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. महत्त्वाच्या व्यक्ती भेटतील. विविध प्रकारचे लाभ होतील. मनात प्रसन्न विचार राहतील. आपले अंदाज बरोबर ठरतील. मोठ्या योजना आखल्या जातील.

तूळ- नोकरीत सहकारी वर्गाशी जुळवून घेतलेले बरे. काही अडचणी आल्यास जवळचे लोकच मदत करतील. जीवनसाथीची चांगली साथ तुम्हाला मिळेल. नोकरीसाठी मुलाखती देत असाल तर त्यात यश मिळेल. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. मन आनंदी राहील.

वृश्चिक- अडकलेले पैसे परत मिळतील. आपली बाजू लोकाना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. महत्त्वाच्या कामात थोड्या अडचणी येतील. नशिबाचा कॉल तुमच्या बाजूने राहील. जवळच्या लोकांसमवेत सहलीला जाऊन याल. प्रसिद्धी, मानसन्मान प्राप्त होईल.

धनु- मनात काळजीचे विचार राहतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. मात्र, जुने वाद उकरून काढू नका. फार अचाट साहस करण्याच्या भानगडीत पडू नका, आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. संयम सोडता कामा नये.

मकर- जीवनसाथीशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. महत्त्वाच्या कामासाठी बरीच धडपड करावी लागेल. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. तरुण वर्गाला आनंददायक बातम्या कळतील.

कुंभ- चांगल्या संधी मिळतील. कामाचा ताण कमी राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. नवीन ओळखी होतील. त्यातून तुमचा फायदा होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. वडीलधाच्या मडळीचे मार्गदर्शन घ्या.

मीन- आर्थिक व्यवहार करताना 'खबरदारी घ्या. जनसंपर्क चांगला राहील. कागदोपत्री नोंदी नीट ठेवा. करारातील अटी आणि शर्ती वाचून घ्या. सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील. प्रशंसा होईल.
 विजय देशपांडे ज्योतिषविशारद) 

टॅग्स :फलज्योतिष
Open in App