आजचे राशीभविष्य - 23 मे 2023; 'या' राशीतील व्यक्तींना महत्वाच्या कामात यश मिळेल; तर यांना धनलाभाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-05-23 07:24:22 | Updated: May 23, 2023 07:24 IST

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष- विविध मार्गानी धनप्राप्ती होईल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता मिळेल. भावडांची ख्यालीखुशाली कळेल. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत सबुरीने वागण्याची गरज आहे. काहींना प्रवासाचा योग येईल.

वृषभ- यशदायक दिवस आहे. ओळखीचे फायदे होतील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. मालमतेच्या कामात सफलता मिळेल. इतरांना स्वतःहून सल्ला देऊ नका.

मिथुन - एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. आवडत्या खाद्य पदार्थाचा आस्वाद घेता येईल. मनात सकारात्मक विचार राहतील. प्रेमात सफलता मिळेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. चांगल्या बातम्या कळतील.

कर्क- एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. समाजात तुमचा गौरव होईल. नोकरीत तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. प्रवास घडून येईल. मनोरंजनपर कार्यक्रमात सहभागी व्हाल.

सिंह- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. चांगल्या बातम्या कळतील. विरोधकांच्या कारवाया थंडावतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. कार्यक्षेत्रात तुमचा दबदबा राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील.

कन्या -मनात सकारात्मक विचार राहतील. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहाल. नोकरीत अनुकूल बदल होतील. मित्र •मंडळींच्या भेटीगाठी होतील. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. अधिकारात वाढ होईल.

तूळ - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. वरिष्ठांकडून चांगले सहकार्य मिळेल. नवीन माहिती कळेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. मोजमजा करण्याच्या निमित्ताने प्रवास घडून येईल. नशिबाचा कौल तुमच्या बाजूने राहील. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील.

वृश्चिक- चांगल्या वार्ता समजतील. ग्रहमान अनुकूल राहील. सहकारी वर्गाची साथ राहील. प्रवासात दगदग होईल. फार धडपड करून कामे न करता आरामात कामे करा. काही कामे खोळंबून राहतील. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. एखाद्या उलाढालीत फायदा होईल.

धनू -ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. प्रवासाचा योग येईल. कामे मार्गी लागतील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. जोडीदाराची साथ राहील. विवाहेच्छुना अनुकूल परिस्थिती राहील. चागली स्थळे चालून येतील. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे.

मकर- लोकांच्या सहवासात मन रमेल. नातेवाईक जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. दगदग करू नका. महत्त्वाचे काम पुढे डकला. आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घ्या. जीवनसाथीचा सल्ला उपयुक्त ठरेल. एखादे पुस्तक वाचा.

कुंभ- हाती घ्या तडीस न्याल अशी परिस्थिती राहील. आवडत्या छंदासाठी वेळ चाल. मनात धार्मिक विचार राहतील, मनासारख्या घटना घडतील. सार्वजनिक कार्यात तुमचा पुढाकार राहील. परीक्षांचे निकाल मनासारखे लागतील.

मीन- नोकरीत मिळेल. आर्थिक आवक चांगली अनुकूल बदल होतील. काहींना चांगली संधी राहील. तुमच्या बोलण्याला महत्त्व दिले जाईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. कार्यक्रमानिमित्त लोकांच्या भेटीगाठी होतील. -विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)

टॅग्स :फलज्योतिष
Open in App