आजचे राशीभविष्य - 17 मे 2023; 'या' राशीतील लोकांना आर्थिक लाभ, तर यांना मिळेल नोकरीत नवी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-05-17 07:40:07 | Updated: May 17, 2023 07:40 IST

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष- तुमच्या मनावरील ताण निघून जाईल. काही अडचणी असतील तर त्या दूर होतील. मनात नावीन्यपूर्ण कल्पना येतील. आर्थिक आवक चांगली राहील. तरुण वर्गाने मोहापासून दूर राहण्याची गरज आहे. जीवनसाथीच्या लहरीपणामुळे त्रास होईल.

वृषभ- मनात काळजीचे विचार राहतील. महत्त्वाच्या कामात अचानक अडचणी येतील. विलंबामुळे थोडा मनस्ताप सहन करावा लागेल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. वडिलोपार्जित उत्पन्नाचा लाभ होईल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल.

मिथुन-आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो. मात्र, कुणाच्या प्रभावाखाली येऊन मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. जीवनसाथीची चांगली साथ राहील.

कर्क- नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. कामाचा ताण राहील. अचानक झालेले बदल शांतपणे अंगिकारले पाहिजेत. घरी अचानक पाहुणे येतील. हाती घेतलेल्या कामात वरिष्ठांकडून मदत मिळेल. त्यामुळे कामाचा हुरूप वाढेल.

सिंह- तुम्हाला भाग्याची साथ राहील. अनेक अडचणींवर मात करता येईल. कामे होतील, पण त्यासाठी परिश्रम करावे लागतील. संयमाने वागण्याची गरज आहे. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.

कन्या- नोकरीत अनुकूल वातावरण राहील. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. आपण हाती घेतलेल्या महत्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. प्रवास शक्यतो टाळा. वाहन जपून चालवा. आर्थिक आवक चांगली राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

तूळ- व्यवसायात सतत कार्यरत राहाल. आर्थिक आवक बच्चापैकी राहील. मनात आनंदी विचार राहतील. आत्मविश्वासाने कामे कराल. तरुण वर्गाने मोहापासून दूर राहण्याची गरज आहे. मौजमजा करण्याच्या उद्देशाने फिरणे होईल. घरात कुरबुर होऊ शकते.

वश्चिक- महत्त्वाच्या कामात अडथळा येईल. लोकांचे म्हणावे तसे सहकार्य मिळणार नाही. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. मात्र, आपला आत्मविश्वास कमी होणार नाही. काही चांगल्या बातम्या कळतील. कामाचा फार ताण घेऊ नका.

धनु- व्यवसायात आत्मविश्वासाने वाटचाल कराल, नोकरीत अस्थिर वातावरण असल्याचे जाणवेल. तुम्हाला जीवनसाथीची चांगली साथ मिळेल. मनात चलबिचल सुरु राहील. मुलांची काळजी वाटेल. त्यांचे हट्ट पुरवावे लागतील, नावलौकिक वाढविणाऱ्या घटना घडतील.

मकर- नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. कामाचा ताण वाढेल. घरात लगबग राहील. कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. पाहुणे मंडळी येतील. त्यांची सरबराई करण्यात वेळ वाल, मुलांना योग्य संधी मिळेल. ओळखीचे फायदे होतील.

कुंभ- नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. घरात तुमचा शब्द खाली पडू दिला जाणार नाही. मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. त्यांचे कौतुक होईल. कलाकारांना प्रसिद्धी मिळेल. चांगल्या संधी मिळतील. मानसन्मान मिळेल.

मीन- धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. वडिलोपार्जित संपत्तीच्या कामात यश मिळेल. अनावश्यक खर्च होईल. व्यवसायात भरभराट होईल. धाडसी पावले टाकाल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मुलांची प्रगती होईल. 

- विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)

टॅग्स :राशिभविष्य २०२१फलज्योतिष
Open in App