मेष
अनावश्यक खर्च करण्याचा मोह टाळला पाहिजे. मनात सकारात्मक विचार राहतील. आपल्यावर कामाचा ताण राहील. नवीन कल्पना विकसित कराल. त्यात तुमचा बराच वेळ जाईल. चोरी. नुकसानीपासून थोडे सतर्क राहण्याची गरज आहे.
वृषभ
व्यवसायात तुमचे आडाखे बरोबर ठरतील. हाती पैसा खेळता राहील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. हाती घ्याल ती कामे तडीस न्याल, अशी परिस्थिती राहील. ग्रहमानाची चांगली साथ तुम्हाला राहील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चागला काळ.
मिथुन
एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. लोकांच्या प्रशंसेस पात्र ठराल, भेटीगाठी होतील. लोक तुम्हाला मदत करतील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत बदल होऊ शकतात.
कर्क
महत्त्वाच्या कामात किरकोळ स्वरूपाच्या अडचणी येतील. मात्र आपण मुत्सद्दीपणाने वागून त्यातून मार्ग काढाल. एखाद्या उलाढालीत व्यस्त राहाल. मनात सकारात्मक विचार राहतील. प्रवासाचा योग येईल. प्रवासात मौजमजा करता येईल.
सिंह
महत्त्वाची बातमी कानावर पडेल. काही तरी नवीन करून दाखवण्याची इच्छा निर्माण होईल. कार्यक्षेत्रात तुमचा दबदबा राहील. प्रवासात सतर्क राहा. नोकरीत अनुकूल स्थिती राहील. सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.
कन्या
महत्त्वाच्या कामात जाणकार मंडळींचा सल्ला घ्या. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. कामाचा ताण राहील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. त्यामुळे अनेक कामे पूर्ण होतील. कुणावरही चटकन विश्वास ठेवू नका, लोकांचे अंतस्थ हेतू ओळखा
तूळ
आनंदवार्ता कानावर पडतील जोडीदार चांगली साथ देईल, घरात आनंदी वातावरण राहील. आपल्यासमोर आलेले प्रस्ताव नीट तपासून घ्या. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका, तुमच्या शब्दांमुळे लोकांचे मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या.
वृश्चिक
हाती घ्याल ते तडीस न्याल. अशी परिस्थिती राहील. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.
धनू
विविध क्षेत्रांत यश मिळेल. तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. प्रसिद्धी, मानसन्मान प्राप्त होईल. नोकरीत तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. घरातील सदस्याशी समन्वय ठेवण्याची गरज आहे.
मकर
कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीला पूरक वातावरण राहील. मोठे प्रकल्प हाती घेतले जातील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. अनुकूल वातावरण राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. आर्थिक उलाढाली जपून करा. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल.
कुंभ
नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. लोकाच्या आदरास पात्र ठराल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. ग्रहमानाची चांगली साथ तुम्हाला मिळेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे.
मीन
हाती घेतलेल्या महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. लोकांचे सहकार्य मिळेल. मनावरील ताण कमी होईल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. महत्त्वाचे व्यवहार सावधपणे करा. चैनीवर खर्च कराल.
विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)