मेष- प्रयत्नांना यश मिळेल. मात्र, काही तरी चुटपुट लागून राहील. त्यामुळे यशाचा म्हणावा तेवढा आनंद वाटणार नाही. थोडा सकारात्मक विचार केला तर बरे होईल. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. धनलाभ होऊ शकतो. वेळापत्रक काटेकोरपणे पाळा.
वृषभ- तुमच्या मनात कल्पक विचार येतील. त्यामुळे कामाचा ताण कमी होण्यास मदत मिळेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. लोकांशी संवाद ठेवा. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल, व्यवसायात तुमची आघाडी राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील.
मिथुन- आनंदी विचार राहतील. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ द्यावा लागेल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. जवळच्या नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. काहींना प्रवास घडून येईल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती राहील.
कर्क- महत्त्वाची 'कामे पुढे ढकलणे ठीक राहील. त्यामुळे तुमच्या अनावश्यक खर्चाला आळा बसेल. कामे झालीच पाहिजेत, असा अट्टहास करू नका. आराम करण्यासाठी वेळ द्या. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. अचानक धनलाभ होऊ शकतो.
सिंह- एखादा कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी वेळ द्याल. तुमच्या ज्ञानाचा व अनुभवाचा इतरांना फायदा होईल. व्यवसायात मालाची विक्री चांगली. पैशांचा ओघ सुरु राहील. काही अवचित फायदे होतील. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल.
.
कन्या - महत्त्वाची कामे पुढे ढकला. कामाची पूर्वतया करून ठेवा, तुमची गोपनीय माहिती इतरांना सांगू नका. नाही तर लोक त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करतील. अनावश्यक खर्चाला आवर घाला. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
तूळ - महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. त्यासाठी लोकांची चांगली मदत होईल. धनलाभ होऊ शकतो. काही चांगल्या बातम्या कळतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. चांगल्या लोकांमध्ये उठबस राहील. मनात सकारात्मक विचार राहतील.
वृश्चिक- मंगलकार्याचे आयोजन केले जाईल. त्या निमित्ताने लोकांची ये-जा राहील. खाण्या-पिण्याच्या पदार्थांची रेलचेल राहील. नातेवाइकांशी बोलून मन मोकळे होईल. नोकरीत काही बदल होऊ शकतात. पगारवाढ व इतर अनेक लाभ होतील.
धनू- अनुकूल वातावरण राहील. तुमच्या हातून चांगली कामे होतील. लोक तुमची प्रशंसा करतील. काहींना पुरस्कार जाहीर होतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. व्यवसायात भरभराट होईल. मालाची विक्री चांगली होईल.
मकर- हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. मात्र अनेकांची मने जोडण्याचे काम करावे लागेल. एककल्लीपणाने कामे करू नका. लोकांचे मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.ज्येष्ठांचा मान राखा.
कुंभ-ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. आत्मविश्वासाने वाटचाल सुरु राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. समाजात तुमचा मान वाढेल. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. नवीन संधी मिळतील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल.
मीन- कामाचा ताण राहील. कामाची यादी बनवून प्राधान्यक्रमाने कामे करा. शांत चित्ताने कागदांची जुळवाजुळव करा. घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. वडीलधाऱ्या मंडळींचे मार्गदर्शन घेणे फायदेशीर ठरेल.
- विजय देशपांडे (ज्योतिषविशारदा