आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२३: धनलक्ष्मी प्रसन्न, नोकरी बदल शक्य; विविध लाभांचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-11-02 07:34:14 | Updated: November 2, 2023 07:34 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: प्रवासाचे बेत ठरतील. काहीना जवळचा प्रवास घडून येईल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. जीवनसाथीशी सूर जुळतील. भेटवस्तू मिळतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. कुणांचा अनादर होईल, असे शब्द वापरू नका. थोडा संयम बाळगा.

वृषभ: धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. हाती आलेला पैसा खर्च करून टाकण्याकडे कल राहील. जीवनसाथीचे हट्ट पुरवावे लागतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. व्यवसायानिमित्त सतत फिरणे होईल.

मिथुन: तुमच्या समोरील अडचणी दूर होतील. त्यामुळे हलके हलके वाटेल. तरुणवर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मुलांशी संवाद ठेवा. त्यांच्या अडचणी समजून घ्या.

कर्क: महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. संयम बाळगण्याची गरज आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. कागदपत्रे सांभाळा. मनात काळजीचे विचार राहतील. आर्थिक बाजू बळकट राहील.

सिंह: हाती घ्याल ते तडीस न्याल, अशी परिस्थिती राहील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. भेटवस्तू देण्यास हरकत नाही.

कन्या: नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. त्यात आपण सतत व्यस्त राहाल. वसुलीच्या कामात काही अडचणी असतील. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. घरी पाहुणे मंडळी येतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल.

तूळ: तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. विरोधकांची तोंडे बंद होतील. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. भाग्याची चांगली साथ राहील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. समाजात तुमचा मान वाटेल. अचानक प्रवास करावा लागेल.

वृश्चिक: मनात काळजीचे विचार राहतील. वडीलधाया मंडळींचा मान राखा. नोकरीत कामाचा ताण कमी राहील. एखादे लचांड मागे लावून घेऊ नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा, महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. अचानक धनलाभ होईल.

धनु: व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. बरोबरीच्या लोकांच्या तुलनेत तुमचे पारडे जड राहील. कामातील अडचणी दूर होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. जवळच्या लोकांच्या सहवासात मन रमेल. कागदोपत्री पूर्तता करण्यात दिरंगाई करू नका.

मकर: तुमच्यासमोर कामांचा ढीग राहील. त्यात तुमचा कस लागेल. पाय ओढणाच्या लोकांना दूर ठेवा, तर तुमची कामे मार्गी लागतील. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. आरोग्याची काळजी घ्या. जीवनसाथीचे मन मोडू नका, किरकोळ वाद टाळा. 

कुंभ: ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. काही लोकांना तुमचा द्वेष वाटेल. त्यांच्याकडे लक्ष देण्यात वेळ घालवू नका.

मीन: नोकरीत बदलीची शक्यता आहे. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. घर सजावटीकडे लक्ष द्याल. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. तुमच्यासमोर गोड बोलून माघारी निंदा करणाऱ्या लोकांना दूर ठेवा.

- विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App