Daily Top 2Weekly Top 5

सूर्याचा आर्द्रा नक्षत्र प्रवेश: ‘या’ ३ राशींना पुढील १५ दिवस शुभ; पैसाच पैसा अन् लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-06-25 15:43:41 | Updated: June 25, 2022 15:43 IST

सूर्याचा नक्षत्र प्रवेश अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यावरून पावसासह अनेक गोष्टींचा अंदाज बांधला जातो. जाणून घ्या...

Open in app

ज्योतिषशास्त्रात जसे नवग्रहातील ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. अगदी त्याचप्रमाणे नवग्रहातील ग्रह नियोजित कालावधीनंतर एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करत असतात. या नक्षत्रांना देवता आणि ग्रहांचे स्वामित्व असते. त्या त्या नक्षत्रावर त्या त्या ग्रहांचा विशेष प्रभाव दिसून येऊ शकतो. या नक्षत्रातील प्रवेशाचा राशींवरही प्रभाव पडत असतो. कारण काही नक्षत्रांची मिळून रास तयार होत असते. १२ राशींमध्ये २७ नक्षत्रे विभागण्यात आली आहे. (sun transit in ardra nakshatra june 2022)

आता नवग्रहांचा राजा आर्द्रा नक्षत्रात आहे. ०६ जुलै रोजी सूर्य पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करेल. सूर्याच्या स्थितीत होणारा प्रत्येक बदल, मग तो राशीतील किंवा नक्षत्रातील परिवर्तन असो, ज्योतिषशास्त्रात एक अतिशय महत्त्वाची घटना मानली जाते. सूर्याच्या या नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम सर्व १२ ग्रहांवरच नव्हे तर जगभरात दिसून येईल, असे सांगितले जाते. सर्व २७ नक्षत्रांपैकी आर्द्रा नक्षत्र महत्त्वाचे मानले जाते. आर्द्रा नक्षत्राची राशी मिथुन आहे, जी बुधाची राशी आहे.पण, आर्द्रा नक्षत्राचा स्वामी ग्रह राहु मानला जातो. आताच्या घडीला सूर्य मिथुन राशीत आहे. 

कोणत्या राशींना अच्छे दिन येणार?

- मिथुन: मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याने आर्द्रा नक्षत्रात प्रवेश केल्याचा विशेष लाभ होईल. या कालावधीत आर्थिक स्थितीत झपाट्याने सुधारणा होऊ शकेल. तसेच कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक क्षेत्रातही फायदा होऊ शकतो. तब्येतीची काळजी घ्या.

- सिंह: या राशीच्या लोकांना विशेष फायदा होईल, सिंह राशीच्या लोकांसाठी हे परिवर्तन शुभ सिद्ध होईल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. यामुळे संपत्तीत वाढ दिसून येते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि या काळात पदोन्नतीची शक्यता आहे. सूर्य नक्षत्र बदलत असताना तुम्ही कोणत्याही व्यवसायात असाल तर त्यात फायदा मिळू शकेल. या काळात तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता.

- कन्या: या राशीच्या लोकांसाठी सूर्याच्या राशीत होणारा बदल शुभ राहू शकेल. या काळात आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते तसेच उत्पन्नाचे स्रोत वाढतील. कामाच्या ठिकाणी लोकांसोबत सलोख्याने वागावे लागेल. सांभाळून राहावे लागेल. पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. उच्च अधिकार्‍यांशी तुमचे संबंध अधिक घट्ट होताना दिसत आहेत. या काळात तुम्हाला मेहनतीचे फळ मिळणार आहे. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित काही चांगली बातमीही तुम्हाला मिळू शकते.
 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App