Budh Margi Vrishabh 2022: बुध मार्गी: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना अच्छे दिन; विशेष लाभाचे उत्तम योग, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-06-02 08:02:05 | Updated: June 2, 2022 08:02 IST

बुध वृषभ राशीत मार्गी होत असून, कोणत्या राशीच्या व्यक्तींना कसा लाभ मिळू शकेल? जाणून घ्या...

Open in app

नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध हा शुक्र ग्रहाचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत मार्गी होत आहे. यापूर्वी मे महिन्यात वृषभ राशीत बुध वक्री झाला होता. आता, ३ जून रोजी बुध मार्गी होत आहे. बुद्धिकारक मानला गेलेला बुध मार्गी झाल्याचा सर्वच राशीच्या व्यक्तींवर प्रभाव दिसू शकेल. मात्र, ५ राशीच्या व्यक्तींसाठी हा बदल लाभकारक ठरू शकेल. (Mercury Directs Taurus 2022)

ज्योतिषीय दृष्टिकोनातून जून महिना महत्त्वाचा मानला जात असून, नवग्रहातील ५ महत्त्वाचे ग्रह स्थानबदल करणार आहेत. बुध मार्गी झाल्यानंतर नवग्रहांमध्ये न्यायाधीश मानला जाणारा शनि ५ जून रोजी कुंभ राशीत वक्री होत आहे. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १५ जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल, तसेच नवग्रहांचा सेनापती मंगळ २७ जून रोजी आपलेच स्वामित्व असलेल्या स्व-राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करेल. तर, शुक्रही १८ जून रोजी स्व-राशीत म्हणजेच वृषभमध्ये प्रवेश करेल. बुध मार्गी होण्याचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ होऊ शकेल, ते जाणून घेऊया... (Budh Margi in Vrishabh Rashi 2022)

‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना अच्छे दिन; विशेष लाभाचे उत्तम योग

कर्क: या राशीच्या व्यक्तींना बुध मार्गी होणे लाभदायक ठरू शकेल. करिअरमध्ये अनेकविध संधी प्राप्त होऊ शकतील. अडकलेल्या योजना मार्गी लागू शकतील. जुनी गुंतवणूक लाभदायक ठरू शकेल. एखादी इच्छा पूर्ण होऊ शकेल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना हा कालावधी विशेष फायदेशीर ठरू शकेल. नोकरीत पदोन्नतीचे योग जुळून येऊ शकतात.

सिंह: या राशीच्या व्यक्तींना बुध मार्गी होणे यशकारक ठरू शकेल. कार्यक्षेत्रील आपल्या कामाचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ प्रशंसा करू शकतील. नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांना उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. वडिलांचे सहकार्य लाभू शकेल. व्यापारी वर्गाला फायदा मिळू शकेल.

कन्या: राशीस्वामी असलेल्या बुधचे मार्गी चलन या राशीच्या व्यक्तींसाठी भाग्यकारक ठरू शकेल. नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. धार्मिक कार्यात सक्रीय सहभागी होऊ शकाल. समाजातील मान-सन्मान, प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढू शकेल. प्रवासाचे बेत आखू शकाल.

मकर: या राशीच्या व्यक्तींना बुध मार्गी होणे शुभ ठरू शकेल. विद्यार्थ्यांना यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल. एकाग्रता वाढेल. आनंदवार्ता कानावर पडू शकतील. प्रेमात असलेल्या व्यक्तींना चांगला कालावधी. विवाहेच्छुक मंडळींना चांगली स्थळे येऊ शकतील. 

कुंभ: या राशीच्या व्यक्तींना बुधचे मार्गी चलन सकारात्मक ठरू शकेल. एखादा जुना वाद संपुष्टात येऊ शकेल. न्यायालयीन प्रकरणात सकारात्मक वार्ता समजू शकेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. नोकरदार वर्गाला सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य प्राप्त होऊ शकेल. 
 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App