June Horoscope: जूनमध्ये ५ ग्रह बदलतील राशी; ३ राशींची होईल झपाट्याने प्रगती व होईल भरघोस कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-05-26 13:03:45 | Updated: May 26, 2022 13:03 IST

June Horoscope: जून महिना ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचा ठरणार आहे. जून २०२२ मध्ये ५ ग्रह राशी बदलणार आहेत, ज्याचा सर्व राशींवर मोठा प्रभाव पडेल.

Open in app

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळी आपली राशी बदलतो. ग्रहांच्या बदलांचा चांगला वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. येत्या जूनमध्ये ५ महत्त्वाचे ग्रह राशी बदलणार आहेत. महिन्याच्या सुरुवातीला बुध ग्रहाची चाल बदलेल. ३ जूनपासून बुध ग्रह वृषभ राशीत भ्रमण करणार आहे. यानंतर, ५ जूनपासून, शनी स्वतःच्या राशीत कुंभ राशीत मागे जाईल. त्यानंतर १५ जून रोजी ग्रहांचा राजा सूर्य राशीत बदल करेल. याशिवाय जूनमध्ये शुक्र आणि मंगळ देखील राशी बदलतील. हे पाच ग्रह संक्रमण ३ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होतील. जाणून घ्या जून २०२२ च्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी जून २०२२ खूप शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांना या महिन्यात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. करिअरमध्ये मोठी प्रगती होईल. नवीन नोकरीची संधी चालून येईल. उत्पन्नही वाढेल. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने मोठी बचत करू शकाल. व्यापार्‍यांनाही या महिन्यात भरपूर फायदा होईल. बराच काळ अडकलेला पैसा या महिन्यात मिळू शकतो. आरोग्यही चांगले राहील. या महिन्याचा पुरेपूर आनंद घ्या.

सिंह: जून २०२२ मध्ये होणारे ग्रह संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला काळ आणेल. मान-सन्मान वाढेल. उत्पन्न वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्वातील आकर्षण वाढेल. व्यवसायात मोठा बदल घडू शकतो. रखडलेली कामेही आता पूर्ण होतील. तुमचे कौतुक होईल. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल. एकंदरीत हा महिना सर्वच बाबतीत समृद्ध अनुभव देणारा ठरेल.

धनु: धनु राशीच्या लोकांची  जून २०२२ मध्ये बरीच आर्थिक प्रगती होईल. हा धन लाभ तुमच्या अनेक इच्छा पूर्ण करेल. भविष्यात बचत करण्यास तुम्ही सक्षम असाल. व्यापार्‍यांना गुंतवणुकीच्या नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे भरपूर नफा मिळेल. भविष्याच्या दृष्टीनेही मोठा करार होऊ शकतो. जुने प्रलंबित पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :फलज्योतिष
Open in App