Horoscope: राशीभविष्य, ३१ मे २०२२, नोकरीमध्ये तुमचे पारडे जड राहील, पैशाचा ओघ सुरू राहील

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-05-31 07:59:59 | Updated: May 31, 2022 07:59 IST

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या 

Open in app

मेष - एखाद्या कामासाठी चिकाटीने प्रयत्न करावे लागतील.  घरातील सदस्यांशी संवाद साधला पाहिजे. निष्कारण गैरसमज करून घेऊ नका. मोठ्या उलाढाली जपून करा. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. काहींना कामानिमित्त प्रवास करावा लागेल. 

वृषभ -  अतिशय अनुकूल ग्रहमान आहे. चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये याल. आर्थिक लाभ होईल. मात्र हाती आलेल्या पैशांची बचत केली पाहिजे. त्यासाठी जाणकारांचा सल्ला घ्या. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. नोकरीमध्ये तुमचे पारडे जड राहील. 

मिथुन - काहींना कामानिमित्त प्रवास घडून येईल. मात्र प्रवासाचे नियोजन नीट करा. नोकरीमध्ये तुमचे पारडे जड राहील. पैशाचा ओघ सुरू राहील. उसने पैसे देताना विचार करून द्या. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे योग्य राहील. अन्यथा मनस्ताप सहन करावा लागेल.   

कर्क - ग्रहमानाची साथ तुम्हाला मिळेल. त्यामुळे प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. भेटवस्तू मिळतील. एखाद्या व्यवहारात चांगला फायदा होईल. कुणी तुमच्या कामात निष्कारण ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करेल. थोडे मुत्सद्दीपणे वागा. जवळचे प्रवास होतील.  

सिंह -  प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. नवीन प्रकल्प हाती घेतले जातील. कामाचा व्याप सांभाळताना धावपळ होईल. मुलांशी संवाद साधला पाहिजे. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. 

कन्या -  भाग्याचे पाठबळ राहील. प्रवासात दगदग होईल. थोडे सतर्क राहा. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे योग्य राहील. नोकरीमध्ये तुमचे विचार इतरांच्या पचनी पडणार नाहीत. त्यामुळे गैरसमज होतील. इतरांच्या भानगडीत पडू नका. म्हणजे निरर्थक वेळ वाया जाणार नाही. 

तूळ -  धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. लोकांकडून प्रशंसा होईल. मात्र काही लोक तुमच्या माघारी तुमच्यावर टीका करतील. त्यामुळे विचलित होऊ नका. मुले अभ्यासात प्रगती करतील. त्यांचे हट्ट पुरवावे लागतील. 

वृश्चिक - नोकरीत दगदग होईल. कामे पूर्ण करताना दमछाक होईल. थोडे संयमाने वागणे आवश्यक राहील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. एखादी व्यक्ती अपेक्षाभंग करेल.स्पष्ट बोलणे आवश्यक असले तरी गोड शब्दात ते बोलले पाहिजे. 

धनू  -  नोकरीत तुमचे पारडे जड राहील. मात्र तुमचे महत्त्व लोकांना सहन होणार नाही. आरोग्याची काळजी घ्या. तुमचा मोबाईल, एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड हरवणार नाही याची दक्षता घ्या. महिलांनी दागिन्याची, पर्सची काळजी घ्यावी.  

मकर -  सार्वजनिक कार्यात पुढाकार घ्याल, मानसन्मान वाढवणाऱ्या घटना घडतील. मुले अभ्यासामध्ये प्रगती करतील. जवळचे प्रवास घडून येतील. काही लोक तुमचा उदोउदो करून त्यांची कामे करून घेण्याचा प्रयत्न करतील. माणसे ओळखली पाहिजे.

कुंभ - नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. पैशाचा ओघ चांगला राहील.मनासारखे भोजन मिळेल.गप्पाटप्पा होतील. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. 

मीन - काहींना प्रवास घडून येईल. प्रवासाचे नियोजन नीट केले पाहिजे. एखादी चांगली बातमी कळेल. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. आवडत्या पदार्थांचा आस्वास घेता येईल. अपमान होईल, असे बोलू नका.  
 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App