Guru Purnima 2022: गुरुपौर्णिमेला जुळून येतोय त्रिग्रही योग; 'या' तीन राशींना मिळेल सौख्याचा भोग!

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-07-06 10:50:43 | Updated: July 6, 2022 10:50 IST

Guru Purnima Triyoga astrology: हिंदू धर्मात महर्षी वेद व्यास जयंती ही तिथी गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यंदा १३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे. या दिवशी त्रिग्रही योग तयार होत आहे. हा योग काही राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे.

Open in app

हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेच्या सणाला विशेष महत्त्व आहे. गुरु परमात्मा परेशु अर्थात गुरु हे ईश्वरासमान मानले जातात, नव्हे तर ते पृथ्वीवरील देव मानले जातात. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. यंदा हुरु पौर्णिमा १३ जुलैला आहे. या तिथीला सूर्य, बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह मिथुन राशीत स्थानापन्न होणार आहेत. त्यामुळे मिथुन राशीमध्ये तयार झालेला हा त्रिग्रही योग बाराही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. विशेषतः ३ राशीच्या लोकांना याचा अधिक फायदा होणार आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

वृषभ - या शुभ संयोगाने वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येतील. या दरम्यान, एखाद्याला दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तसेच काही जणांना अनपेक्षित धनलाभही संभवतो. हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील. समाजात तुमच्याप्रती आदर वाढेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील आणि लवकरच शुभ योग जुळून येतील. 

मिथुन - ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होत आहे. मिथुन राशीच्या लोकांना या योगातून नशिबाची साथ मिळेल. या काळात काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर करिअरमध्येही प्रगती होऊ शकते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात अनावश्यक खर्च कमी होतील.

धनु - या वर्षीची गुरुपौर्णिमा धनु राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली आर्थिक संधी मिळू शकते. त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांच्याही शक्यता निर्माण होत आहेत. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल. करिअरला नवीन दिशा मिळेल आणि धनलाभाच्या संधी मिळतील. 

टॅग्स :फलज्योतिषगुरु पौर्णिमा
Open in App