आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-08-16 07:56:15 | Updated: August 16, 2025 07:56 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - चंद्र आज 16 ऑगस्ट, 2025 शनिवार च्या दिवशी मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरुवातीला नवीन कार्यारंभ करण्यास आपण खूप उत्साहीत असाल. शारीरिक व मानसिक आरोग्य हा उत्साह द्विगुणित करेल. स्नेही, मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह एखाद्या स्नेहसंमेलनास जाऊ शकाल. दुपार नंतर मात्र काही कारणास्तव आपली प्रकृती नरम गरम होईल. आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिक देवाण- घेवाणीत सुद्धा सावध राहावे लागेल. मनाच्या उदासीनतेमुळे नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृषभ - चंद्र आज 16 ऑगस्ट, 2025 शनिवार च्या दिवशी मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज कुटुंबियांशी आपण विचार - विनिमय करू शकाल. घराच्या नूतनीकरणासाठी काही तरतूद कराल. घरी मातेशी व नोकरीत वरिष्ठांशी संबंधातील सौहार्दता वाढेल. दुपार नंतर आपण सामाजिक कार्यात जास्त रस घ्याल. मित्रां कडून लाभ होईल. स्वकीयांशी संपर्क वाढून त्यांच्याशी संबंध सुधारतील. संतती कडून एखादा लाभ संभवतो. नवीन परिचयामुळे मन आनंदित होईल. अचानक धनलाभ संभवतो. आणखी वाचा

मिथुन -
चंद्र आज 16 ऑगस्ट, 2025 शनिवार च्या दिवशी मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आज मित्रांकडून आपणास लाभ होईल. भविष्यात फायदा होऊ शकेल अशा नवीन लोकांच्या ओळखी होतील. धनलाभ होईल. प्रवाचे व सहलीचे नियोजन करू शकाल. सरकारी कामातून फायदा होईल. दुपार नंतर थोडे सावध राहावयास लागेल. इतरांच्या भानगडीत पडू नका. शक्यतो आर्थिक व्यवहार टाळावेत. आणखी वाचा

कर्क -
चंद्र आज 16 ऑगस्ट, 2025 शनिवार च्या दिवशी मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आज आपण नियोजित कार्य करण्यास प्रेरित व्हाल. मात्र, आपणास त्यात अपेक्षित यश न मिळाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. आपला संताप वाढेल. दुपार नंतर मात्र शारीरिक उत्साह व मानसिक खंबीरता ह्यामुळे थोडाफार आनंद मिळवू शकाल. कुटुंबियांशी महत्वाच्या विषयावर चर्चा करू शकाल. घराचे नूतनीकरण करण्यात आपण स्वारस्य दाखवाल व त्या दिशेने काही पाऊल उचलाल. आणखी वाचा 

सिंह -
चंद्र आज 16 ऑगस्ट, 2025 शनिवार च्या दिवशी मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक व मानसिक आरोग्य नरम गरमच राहील. आपला संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी होईल. नोकरीत वरिष्ठांशी महत्वाच्या विषयावर चर्चा करू शकाल. कुटुंबियांशी सुद्धा महत्त्वाच्या विषयावर विचार - विनिमय करू शकाल. आणखी वाचा

कन्या -
चंद्र आज 16 ऑगस्ट, 2025 शनिवार च्या दिवशी मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. नवीन कार्यारंभात व प्रवासात अडचणी येतील. आज कोणत्याही बाबतीत लाभ, लोभ, द्वेष, प्रेम व तिरस्कार इत्यादी भावना मनात न ठेवता सम भावना बाळगल्यास आपली कामे होऊ शकतील. एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवू शकाल. प्रकृतीच्या कटकटींमुळे हैराण व्हाल, व त्यामुळे आपला संताप वाढेल. मात्र , त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या कामावर होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या संतापामुळे कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. एखाद्या धार्मिक समारंभात सहभागी व्हाल. आणखी वाचा

तूळ - 
आज ज्या ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या त्या क्षेत्रात आपली प्रशंसा केली जाईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. दुपार नंतर कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. शक्यतो प्रवास टाळावेत. आणखी वाचा

वृश्चिक -
चंद्र आज 16 ऑगस्ट, 2025 शनिवार च्या दिवशी मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे. व्यापार - व्यवसायात आपण व्यस्त राहाल व त्यातून लाभ सुद्धा होतील. अनेक लोकांच्या सहवासाने विचारांची देवाण - घेवाण होईल. कौटुंबिक व वैवाहिक जीवन समाधानाचे राहील. सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा गौरव होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद उपभोगू शकाल. वाहनसौख्य लाभेल. आणखी वाचा

धनु -
चंद्र आज 16 ऑगस्ट, 2025 शनिवार च्या दिवशी मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आजच्या दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक थकव्याने होईल. कष्टाच्या प्रमाणात अपेक्षित यश प्राप्ती होणार नाही. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आप्तेष्टांसह दिवस आनंदात घालवू शकाल. आर्थिक लाभ झाल्याने भविष्यासाठी काही तरतूद कराल. आपल्या हातून एखादे सत्कार्य घडेल. आणखी वाचा

मकर -
चंद्र आज 16 ऑगस्ट, 2025 शनिवार च्या दिवशी मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज आपण अती भावनाशील व्हाल. संपत्ती संबंधी दस्तावेजात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मानसिक त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शासकीय विषयात यशस्वी होऊ शकाल. अपघाताची शक्यता असल्याने शक्यतो प्रवास टाळावेत. आणखी वाचा

कुंभ -
चंद्र आज 16 ऑगस्ट, 2025 शनिवार च्या दिवशी मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज आपले विचार स्थिर राहणार नसल्याने कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. लेखन कार्य करू शकाल. इतरांच्या वागण्या बोलण्याने आपले मन दुखावले जाऊ शकते. वैचारिक गोंधळामुळे आज संपत्ती संबंधित कोणताही व्यवहार न करणे हितावह राहील. आणखी वाचा

मीन -
चंद्र आज 16 ऑगस्ट, 2025 शनिवार च्या दिवशी मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज आपणास आपल्या स्वार्थाचा त्याग करावा लागेल. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. वाद व मनःस्ताप टाळण्यासाठी आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. कामासाठी एखादा प्रवास संभवतो. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. आणखी वाचा

टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App