अचलपूर नगर परिषदेत ४७ कोटींचा गैरवापर! दोषींवर विभागीय चौकशीचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:23 IST2025-06-20T15:22:40+5:302025-06-20T15:23:06+5:30

Amravati : दलित विकास योजनेंतर्गत कोट्यवधींचा अपहार! दोषींना शासनाची नोटीस

Misappropriation of Rs 47 crores in Achalpur Municipal Council ! Departmental inquiry ordered against the culprits | अचलपूर नगर परिषदेत ४७ कोटींचा गैरवापर! दोषींवर विभागीय चौकशीचा आदेश

Misappropriation of Rs 47 crores in Achalpur Municipal Council ! Departmental inquiry ordered against the culprits

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
अनुसूचित जाती वस्तीचा विकास योजनेत अचलपूर नगर परिषदेने अनुदानित रकमेचा गैरवापर केल्याप्रकरणी दोषी मुख्याधिकारी, अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होणार आहे. नगर विकास विभागाने १८ जून रोजी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नावे पत्र पाठवून दोषींची विभागीय चौकशी करून अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.


नगर विकास विभागाचे अवर सचिव अजित पालवे यांच्या पत्रानुसार अचलपूर नगर परिषदेत दलित वस्ती विकास करण्याचा निधीत गैरप्रकार झाल्याबाबत राज्य मानवी हक्क आयोग येथे प्रकरण क्रमांक ६१४२/२०१८ चा दाखला देण्यात आला. याप्रकरणी किशोर मोहोड यांचा २३ एप्रिल रोजीचा अर्जदेखील सादर होता. जबाबदार संबंधित अधिकारी, पदाधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे निर्देश आयोगाने राज्य शासनास दिले आहे.


४७.४० कोटींच्या शासकीय निधीचा गैरवापर.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका क्रमांक ५२४५/२०२४ अन्वये अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती निधीत गैरप्रकार झाल्याची बाब याचिकाकर्ते किशोर मोहोड यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. प्रायोगिक तत्त्वावर अचलपूर नगरपरिषदेत सन २०१० ते २०१९ या कालावधीत मुख्याधिकाऱ्यांनी ४७कोटी ४० लाखांच्या शासकीय निधीचा कायमस्वरूपी गैरवापर केल्याचे पुराव्यानिशी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

Web Title: Misappropriation of Rs 47 crores in Achalpur Municipal Council ! Departmental inquiry ordered against the culprits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.