The constituency will know about 24 hours before counting | मतमोजणीच्या २४ तासापूर्वी कर्मचाऱ्यांना कळणार मतदारसंघ

मतमोजणीच्या २४ तासापूर्वी कर्मचाऱ्यांना कळणार मतदारसंघ

ठळक मुद्देआयोगाचे निर्देश : ५०० कर्मचाऱ्यांचे तीन वेळा रॅण्डमायझेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा मतदासंघाची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झालेली आहे. यावेळी २० टेबल राहण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया अधिक पारदर्शी पद्धतीने व्हावी, यासाठी मतमोजणीसाठीचे मनुष्यबळदेखील रॅण्डमायझेशन पद्धतीने नियुक्त करावयाचे निर्देश आयोगाने सर्व आरओंना दिले आहेत.
अमरावती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बडनेरा मार्गावरील नेमानी गोडावूनमध्ये होणार आहे. याठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा बंदोबस्त आहे. सहा गोडावूनमध्ये सहा विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रत्येक मतदारसंघात १४ टेबलांवर प्रत्येकी तीन अधिकारी, कर्मचारी मतमोजणी करणार आहेत. यामध्ये एक सुपरव्हायझर, एक सहायक व एक सूक्ष्म निरीक्षक राहणार आहे.
यावर्षी निवडणूक रिंगणात २४ उमेदवार व एक नोटा असल्याने २५ फेºया होतील, त्यामुळे मतमोजणीला बराच अवधी लागण्याची शक्यता असल्याने प्रत्येक मतदारसंघात १४ ऐवजी २० टेबलांवर मतमोजणी करण्याची परवानगी जिल्हा निवडणूक अधिकाºयांद्वारा आयोगाकडे मागण्यात आली आहे. अद्याप ही परवानगी मिळालेली नाही. मात्र, येत्या दोन-तीन दिवसांत परवानगी मिळणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
नव्या नियोजनानुसार प्रत्येक विधनसभा मतदारसंघात २० टेबल लावण्याच्या अनुषंदाने १२० टेबलांवरील कर्मचाºयांचे नियोजन निवडणूक विभागाद्वारा करण्यात आलेले आहे. आवश्यक मनुष्यबळाच्या २० टक्के अधिक मनुष्यबळाचे नियोजन यावेळी करण्यात आलेले आहे. म्हणजेच मतमोजणीसाठी १२० सुपरव्हायझर, १२० सहायक व १२० सूक्ष्म निरीक्षक असे एकूण ३६० कर्मचारी आवश्यक आहेत. २० टक्के अतिरिक्त म्हणजेच ७० कर्मचारी अधिक राहतील. याव्यतिरिक्त अन्य कामांसाठीही किमान ८० असे एकूण ५०० कर्मचारी मतमोजणीसाठी राहणार आहेत. २३ मे रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली आहे.

६० मिनिटांपूर्वी कळणार टेबल
मतमोजणीची प्रक्रिया अधिक पारदर्शी पद्धतीने व्हावी, यासाठी यंदा मनुष्यबळाचे तीन वेळा रँडमायझेशन करण्यात येणार आहे. पहिल्यांदा सर्व कर्मचाºयांच्या यादीचे, त्यानंतर मतदानाचे २४ तास अगोदर मनुष्यबळाचे रँडमायझेशन करून मतदारसंघाची निश्चिती करण्यात येईल व प्रत्यक्ष मतमोजणीचे तासभºयापूर्वी मतदारसंघनिहाय कर्मचाºयांचे रॅँडमायझेशन करून मतमोजणीसाठी कोणता टेबल राहील याची माहिती कर्मचाºयांना देण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया व्हिडीओ कॅमेºयाद्वारे चित्रिकरण केले जाणार आहे.
 

Web Title: The constituency will know about 24 hours before counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.