मुख्यमंत्र्यांने मामेभाऊ अविरोध; चिखलदरा नगरपरिषदेत नाट्यमय घडामोडी, नऊ उमेदवारांची माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:30 IST2025-11-20T13:29:18+5:302025-11-20T13:30:55+5:30
Amravati : चिखलदरा नगरपरिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे सदस्य म्हणून अविरोध निवडून आले आहे.

Chief Minister Cousin unopposed; Dramatic developments in Chikhaldara Municipal Council, nine candidates withdraw
अमरावती: चिखलदरा नगरपरिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे सदस्य म्हणून अविरोध निवडून आले आहे. अल्हाद कलोती आमदार रवी राणा यांच्या प्रयत्नाने बिनविरोध झाले. काँग्रेस उमेदवार शेख इर्शाद शेख जमील तसेच नथ्थू खडके, नामदेव खडके अधिक ९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणा यांच्या फोनवरून आल्हाद कलोती यांना शुभेछ्या दिल्यात. चिखलदरा नगरपरिषदेत भाजपचे पूर्ण पॅनेल निवडून आणण्याचा शब्द आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोनवरून दिला, हे विशेष.