अमरावतीत भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर, तर युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे उपमहापौर

By गणेश वासनिक | Updated: February 2, 2026 18:32 IST2026-02-02T18:32:11+5:302026-02-02T18:32:47+5:30

भाजपचे अमरावती महापालिका निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे व भाजपचे विदर्भ संघटन महामंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

BJP's Srichand Tejwani is the mayor in Amravati, while Yuva Swabhiman's Sachin Bhende is the deputy mayor | अमरावतीत भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर, तर युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे उपमहापौर

अमरावतीत भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर, तर युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे उपमहापौर

गणेश वासनिक

अमरावती : अमरावती महापालिकेत महायुतीची सत्ता स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्याअनुषंगाने सोमवारी भाजपने महापौर श्रीचंद तेजवानी तर युवा स्वाभिमानने सचिन भेंडे यांची उपमहापौरपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजपचे अमरावती महापालिका निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे व भाजपचे विदर्भ संघटन महामंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ६ जानेवारी २०२६ रोजी महापाैर, उपमहापौरपदासाठीची निवडणूक होणार असून सोमवारी तेजवानी महापौर आणि भेंडे उपमहापौरपसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे ११ नगसेवक निवडून आले असून ते भाजपसोबत सत्तेत असणार आहे.

भाजपचे २५ आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे १५ नगरसेवक निवडून आले आहे. अमरावती महापालिकेत ८७ सदस्य निवडून आले असून सत्ता स्थापनेसाठी ४४ एवढे संख्या बळ लागणार आहे. काँग्रेस १५, एमआयएम १२, शिंदेसेना ३, बसप ३, उद्धवसेना २ आणि वंचित बहुजन आघाडी १ असे नगरसेवक  निवडून आले आहे.

Web Title : अमरावती में भाजपा के तेजवानी महापौर, युवा स्वाभिमान के भेंडे उपमहापौर

Web Summary : अमरावती में भाजपा के श्रीचंद तेजवानी महापौर और युवा स्वाभिमान के सचिन भेंडे उपमहापौर बनेंगे। भाजपा-युवा स्वाभिमान गठबंधन ने राकांपा के समर्थन से नगर निगम में सत्ता हासिल की। चुनाव 6 जनवरी, 2026 को होंगे।

Web Title : BJP's Tejwani Mayor, Yuva Swabhiman's Bhende Deputy Mayor in Amravati

Web Summary : In Amravati, BJP's Shrichand Tejwani is set to be mayor, and Yuva Swabhiman's Sachin Bhende, deputy mayor. The BJP-Yuva Swabhiman alliance secures power in the municipal corporation with NCP support. Elections are scheduled for January 6, 2026.