अमरावती महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अविनाश मार्डीकर यांची निवड

By गणेश वासनिक | Updated: March 6, 2026 18:25 IST2026-03-06T18:22:23+5:302026-03-06T18:25:20+5:30

Amravati : महापालिकेच्या २१ व्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे अविनाश मार्डीकर यांची निवड झाली आहे. ते महायुतीचे उमेदवार हाेते, त्यांना ११ मते मिळाली असून काँग्रेसचे प्रशांत महल्ले यांना ३ तर एमआयएम तटस्थ राहिली.

Avinash Mardikar elected as the Chairman of Amravati Municipal Corporation Standing Committee | अमरावती महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अविनाश मार्डीकर यांची निवड

Avinash Mardikar elected as the Chairman of Amravati Municipal Corporation Standing Committee

अमरावती : महापालिकेच्या २१ व्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे अविनाश मार्डीकर यांची निवड झाली आहे. ते महायुतीचे उमेदवार हाेते, त्यांना ११ मते मिळाली असून काँग्रेसचे प्रशांत महल्ले यांना ३ तर एमआयएम तटस्थ राहिली. सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी १६ सदस्य मतदार संख्या हाेती, हे विशेष.

अमरावती महापालिकेच्या स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पीठासीनाखाली स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक शुक्रवारी सकाळी ११ वाजता पार पडली. हात उंचावून मतदान घेण्यात आले. यावेळी महायुतीचे उमेदवार अविनाश मार्डीकर यांना ११ मते मिळाली. तर काँग्रेसचे प्रशांत महल्ले यांना ३ मते प्राप्त झाली. तसेच एमआयएमचे सलाहुद्दीन ईकरोमोद्दीन आणि नजीब खान करीम खान हे दोन सदस्य तटस्थ राहिले. ही सर्व निवडणूक प्रक्रिया इनकॅमेरा घेण्यात आली. अखेर जिल्हाधिकारी तथा पीठासीन सभापती आशिष येरेकर यांनी अविनाश मार्डीकर हे स्थायी समितीचे नवनियुक्त सभापती म्हणून जाहीर केले.

यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक या उपस्थित होत्या. स्थायी समिती सभापतीपदी अविनाश मार्डीकर यांची निवड झाल्याबद्दल महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, सभागृह नेता चेतन गावंडे आणि गटनेता नाना आमले उपस्थित होते. 

Web Title : अमरावती महानगरपालिका स्थायी समिति के अध्यक्ष चुने गए अविनाश मार्डीकर

Web Summary : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (अजित पवार गुट) के अविनाश मार्डीकर अमरावती महानगरपालिका स्थायी समिति के अध्यक्ष चुने गए। उन्होंने कांग्रेस के प्रशांत महल्ले को हराया, एमआईएम तटस्थ रही।

Web Title : Avinash Mardikar Elected Chairman of Amravati Municipal Corporation Standing Committee

Web Summary : Avinash Mardikar of NCP (Ajit Pawar group) elected Amravati Municipal Corporation Standing Committee Chairman. He secured 11 votes, defeating Congress' Prashant Mahalle. MIM remained neutral.