Attack on Devendra Bhuiar candidate in Amravati district | Maharashtra Election 2019; अमरावती जिल्ह्यात उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातक हल्ला

Maharashtra Election 2019; अमरावती जिल्ह्यात उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातक हल्ला

ठळक मुद्देगाडी जळून खाकचार राऊंड फायर केल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सोमवारी सकाळी शेदूरजना घाट येथे अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची चारचाकी वाहन पेटविली. हल्ल्यात जखमी झालेले देवेंद्र भुयार यांना शेंदूरजना घाट पोलिसांनी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. माझ्यावर हल्ला करण्यापूर्वी वाहनाच्या दिशेने फायर करण्यात आल्याचा आरोप देवेंद्र भुयार यांनी केला आहे. दरम्यान देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला झाला. ते जखमी झाले. तथापि, गोळीबाराचे कुठलेही पुरावे घटनास्थळी आढळले नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी सांगितले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शंदूरजना घाट पोलिसांत सुरू आहे.

 

 

 

Web Title: Attack on Devendra Bhuiar candidate in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.