अमरावती महापालिकेवर 'सर्वसाधारण गटाचा' महापौर ! कुणाच्या डोक्यावर चढेल ताज ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 19:58 IST2026-01-23T19:51:20+5:302026-01-23T19:58:22+5:30

Amravati : सत्तास्थापनेसाठी ४४ चा 'जुगाड' सुरु, बसपच्या तीन नगरसेवकांची भूमिका ठरणार महत्त्वाची

A 'general group' mayor will be appointed to the Amravati Municipal Corporation! Who will be crowned? | अमरावती महापालिकेवर 'सर्वसाधारण गटाचा' महापौर ! कुणाच्या डोक्यावर चढेल ताज ?

A 'general group' mayor will be appointed to the Amravati Municipal Corporation! Who will be crowned?

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
अमरावती महापालिकेच्या महापौर पदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. महापौरपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव निघाले असून, १७ व्या महापौर पदासाठी मोठी स्पर्धा होईल, असे चित्र आहे. संख्याबळानुसार भाजप महापौर पदासाठी दावा करणार असला तरी बसपच्या तीन नगरसेवकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. तर, भाजपमध्ये महापौर पदासाठी अनेक दावेदार असल्याचे वास्तव आहे.

महापालिका निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाल्यानंतर एकाही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. सत्तास्थापनेसाठी ४४ ही आकडेवारी जुळविण्यासाठी आता नेत्यांची दमछाक होत आहे. पद आणि अन्य मागण्या पूर्ण कशा कराव्या यातच चर्चेच्या आटोपत असून, ठोस निर्णय अद्यापही झालेला नाही.

'मॅजिक' फिगरची जुळवाजुळव सुरू

गुरूवारी महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित जाहीर झाल्यामुळे अनेक इच्छुकांच्या आकांक्षा बळावल्या आहेत. ४४ हा 'मॅजिक फिगर' कसा जुळवता येईल, यासंदर्भात जोर बैठकांचे सत्र वाढले आहे.

भाजपत महापौर पदासाठी दावेदारांची रांग

  • अमरावती महापालिकेचे नवे महापौरपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव निघाल्याने भाजपत नवीन, जुन्या चेहऱ्यांना महापौर पदाचे वेध लागले आहे. यात महिला व पुरूष नगरसेवकदेखील आघाडीवर आहेत.
  • भाजप महापौर पदासाठी कुणाचे नाव निश्चित करतो, यावरही बरेच काही अवलंबून आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचीसुद्धा तितकीच भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे.
  • किंबहुना कोणता पक्ष कोणाशी आघाडी, युती करणार यावरच महापौर पदाचे गणित जुळणार आहे. भाजपत स्मिता सूर्यवंशी, सुरेखा लुंगारे, लविना हर्षे, ऋषिकेश देशमुख, राधा कुरील, मिलिंद बांबल, स्वाती कुळकर्णी, पद्मजा कौंडण्य, चेतन गावंडे, नूतन भुजाडे आदींची नावे चर्चेत आहेत.

 

काँग्रेसही महापौर पदाच्या शर्यतीत

  • काँग्रेसकडे १५ एवढे संख्याबळ आहे. मात्र राष्ट्रवादी (अजित पवार) ११, एमआयएम १२, वंचित १, उद्धवसेना २, बसप ३ अशी राजकीय पक्षांची मोट बांधून विकासाच्या नावे एकवटण्याची तयारी चालविली आहे. अशी आघाडी झाल्यास महापौर पदासह अन्य पदे काबीज करता येईल, अशी नवीन घडामोड उदयास येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे विलास इंगोले हे महापौर पदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
  • दुसरीकडे आमदार संजय खोडके आणि आमदार रवी राणा यांच्यात राजकीयदृष्ट्या फारसे जमत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) गट कोणाच्या बाजूने उभा राहतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजप २५, युवा स्वाभिमान पक्ष १५ आणि शिंदेसेना ३ असे युतीचे ४३ संख्याबळ आहे. महापौर पदासाठी ४४ एवढे संख्याबळ हवे.

Web Title : अमरावती नगर निगम में सामान्य वर्ग का महापौर! ताज किसके सिर सजेगा?

Web Summary : अमरावती नगर निगम का महापौर पद सामान्य वर्ग के लिए आरक्षित। किसी भी दल को स्पष्ट बहुमत नहीं, प्रतिस्पर्धा तीव्र है। भाजपा एक मजबूत दावेदार है, लेकिन छोटे दलों का प्रभाव है। कई उम्मीदवार प्रतिष्ठित पद के लिए प्रतिस्पर्धा कर रहे हैं।

Web Title : General Category Mayor for Amravati? Who Will Wear the Crown?

Web Summary : Amravati Municipal Corporation's mayoral seat is reserved for the general category. With no party holding a clear majority, competition is fierce. BJP is a strong contender, but smaller parties hold sway. Multiple candidates are vying for the coveted position.