अमरावती महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत १६१ जणांची माघार, ६६१ उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 15:08 IST2026-01-03T15:07:14+5:302026-01-03T15:08:08+5:30
Amravati : २२ प्रभागांत ८७ सदस्यांची होणार निवड; आज चिन्हाचे होणार वाटप

161 people withdraw from Amravati Municipal Corporation general elections, 661 candidates in fray
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारपर्यंत १६१ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली असून ६६१ उमेदवार रिंगणात कायम आहे. २२ प्रभागांतून ८७ सदस्य निवडीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होईल. शनिवार, ३ जानेवारी रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप होणार आहे. त्याकरिता सात ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी नेमण्यात आले आहेत.
या निवडणुकीत बडनेरा झोन कार्यालयात सर्वाधिक १२६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले असून २३ जणांनी माघार घेतली आहे, तर सर्वात कमी नामनिर्देशन पत्र जुने तहसील कार्यालय, मेन पोस्ट ऑफिसजवळ अमरावती येथे सादर करण्यात आले असून येथे १४ उमेदवारांनी माघार घेतली आहे. शनिवार, उमेदवारांना अधिकृतपणे निवडणूक चिन्हाचे वाटप झाल्यानंतर प्रचाराला प्रारंभ होईल, असे संकेत आहेत.
निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र स्पष्ट
झोन रिंगणात माघार
उत्तर झोन क्रमांक रामपुरी कॅम्प, महापालिका कार्यालय ९७ १९
नवे तहसील कार्यालय, सांस्कृतिक भवनसमोर मोर्शी रोड १०० २८
मध्य झोन क्रमांक ३ राजापेठ महापालिका कार्यालय ९४ २६
पूर्व झोन क्रमांक ३ दस्तुरनगर महापालिका कार्यालय १०८ २३
महापालिका शिक्षण विभाग कार्यालय अंबापेठ ८३ २८
जुने तहसील कार्यालय, मेन पोस्ट ऑफिसजवळ अमरावती ५३ १४
दक्षिण झोन क्रमांक ४ महापालिका कार्यालय नवीवस्ती बडनेरा १२६ २३