मतदानासाठी शहरातील ६४ केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ४६९ उमेदवारांची प्रतिष्ठा लागली पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:19 IST2026-01-10T13:17:15+5:302026-01-10T13:19:36+5:30

अकोला महापालिका निवडणुकीत २० प्रभागांमधील ८० जागांसाठी तब्बल ४६९ उमेदवार रिंगणात उतरले असून, त्यापैकी ३६७ उमेदवार विविध राजकीय पक्षांचे आहेत.

CCTV cameras at 64 polling stations in the city, reputation of 469 candidates at stake | मतदानासाठी शहरातील ६४ केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ४६९ उमेदवारांची प्रतिष्ठा लागली पणाला

मतदानासाठी शहरातील ६४ केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ४६९ उमेदवारांची प्रतिष्ठा लागली पणाला

अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच अकोला शहरात प्रचाराचा धुराळा उडत आहे. येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. दरम्यान, प्रशासनाने संवेदनशीलतेचा आढावा घेऊन शहरातील ६४ मतदान केंद्रांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. 

अकोला शहरातील २० प्रभागांमधील ८० जागांसाठी तब्बल ४६९ उमेदवार रिंगणात उतरले असून, त्यापैकी ३६७ उमेदवार विविध राजकीय पक्षांचे आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात चुरशीच्या लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मर्यादित वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पदयात्रा, कोपरा सभा, घराघरात भेटी, वाहन रॅली आणि मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. या धावपळीत उमेदवारांची अक्षरशः दमछाक होत असल्याचे चित्र शहरभर पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत मतदारांचा कल नेमका कुणाकडे आहे, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

प्रशासनाने केली तयारी

मतदान प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शक पार पडावी, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान केंद्रांची पाहणी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.

अकोला शहरातील ६४ संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पोलिस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. १६ जानेवारी रोजी मतमोजणीनंतर महापालिकेच्या सत्तेचा कौल स्पष्ट होणार आहे.

Web Title : अकोला चुनाव: 64 केंद्रों पर सीसीटीवी, 469 उम्मीदवार मैदान में

Web Summary : अकोला नगर निगम चुनाव में ज़ोरदार प्रचार जारी है। 80 सीटों के लिए 469 उम्मीदवार प्रतिस्पर्धा कर रहे हैं। 64 संवेदनशील मतदान केंद्रों पर सीसीटीवी निगरानी रहेगी। प्रशासन 15 जनवरी को शांतिपूर्ण, पारदर्शी मतदान के लिए तैयार। परिणाम 16 जनवरी को।

Web Title : Akola Election: CCTV at 64 Centers; 469 Candidates in Fray

Web Summary : Akola municipal elections see intense campaigning. 469 candidates compete for 80 seats. 64 sensitive polling centers will have CCTV surveillance. Administration prepares for peaceful, transparent voting on January 15. Results on January 16.