तिकीट न मिळाल्याने महिला उमेदवार आक्रमक, इच्छुक उमेदवाराचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:45 IST2025-12-30T15:45:39+5:302025-12-30T15:45:50+5:30
Akola Municipal Corporation Election: अकोला शहरात भाजपअंतर्गत उमेदवारीवरून वाद उफाळून आला असून, तिकीट न मिळाल्याच्या नाराजीमुळे भाजपच्या इच्छुक महिला उमेदवाराने निवडणूक प्रभारी, माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी गोंधळ घातल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

तिकीट न मिळाल्याने महिला उमेदवार आक्रमक, इच्छुक उमेदवाराचा गोंधळ
अकोला - शहरात भाजपअंतर्गत उमेदवारीवरून वाद उफाळून आला असून, तिकीट न मिळाल्याच्या नाराजीमुळे भाजपच्या इच्छुक महिला उमेदवाराने निवडणूक प्रभारी, माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी गोंधळ घातल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
अकोटफैल परिसरातील अनुसूचित जाती राखीव जागेवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या शकुंतला जाधव या उमेदवारी नाकारल्याने तीव्र नाराज झाल्या. त्यांचा प्रभाग युतीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) कडे गेल्याची माहिती समजताच त्यांचा संताप अधिकच वाढला. उमेदवारी डावलण्यात आल्याचा आरोप करत जाधव यांनी माजी महापौर अग्रवाल यांच्या निवासस्थानी जाऊन समर्थकांसह जोरदार घोषणाबाजी केली. यादरम्यान शकुंतला जाधव भावनिक होऊन अश्रूंनी कोसळल्या. तणावाच्या वातावरणात त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती असून, घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अग्रवाल यांच्या निवासस्थानी बंदोबस्त तैनात केला. दरम्यान, या प्रकरणावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.