नागरिकच आता नेत्यांना धडा शिकवत आहेत,ॲड. प्रकाश आंबेडकर यांचं विधान
By सदानंद सिरसाट | Updated: January 15, 2026 15:49 IST2026-01-15T15:47:58+5:302026-01-15T15:49:26+5:30
Akola Municipal Corporation Election: अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी अकोला येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड भूमिका मांडली.

नागरिकच आता नेत्यांना धडा शिकवत आहेत,ॲड. प्रकाश आंबेडकर यांचं विधान
अकोला - महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी अकोला येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड भूमिका मांडली.
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आजचा मतदार अधिक जागरूक झाला आहे. नागरिकच आता नेत्यांना सुधारत असून, आवश्यकतेनुसार त्यांना धडाही शिकवत आहेत.” लोकशाही व्यवस्थेत मतदारांची भूमिका अधिक प्रभावी होत चालल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी निवडणुकीतील मुद्द्यांवर भाष्य करताना सांगितले की, “मुद्दे भटकावण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी, ज्यांनी स्थानिक प्रश्न आणि स्थानिक मुद्दे प्रामाणिकपणे निवडणुकीत मांडले, त्यांनाच मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे.” सध्या महाराष्ट्रात हेच चित्र दिसून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व मूलभूत सुविधांसारखे प्रश्न केंद्रस्थानी येत असून, मतदार या मुद्द्यांवर अधिक सजगपणे मतदान करत असल्याचे या प्रतिक्रियांतून अधोरेखित होते. एकूणच, लोकशाही प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग वाढत असल्याचे चित्र यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.