राहुरीत सुजय विखेंसाठी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:30 AM2019-04-17T11:30:39+5:302019-04-17T11:31:09+5:30

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला विसरून दिवसभर सुजय विखे यांच्यासाठी राहुरी तालुक्यात ११ ठिकाणी वस्ती सभा घेऊन मोर्चेबांधणी केली.

Suhayi Ratchuri | राहुरीत सुजय विखेंसाठी मोर्चेबांधणी

राहुरीत सुजय विखेंसाठी मोर्चेबांधणी

googlenewsNext

राहुरी : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला विसरून दिवसभर सुजय विखे यांच्यासाठी राहुरी तालुक्यात ११ ठिकाणी वस्ती सभा घेऊन मोर्चेबांधणी केली. बंद राहुरी कारखाना सुरू करणाऱ्या सुजय विखे यांनी मदतरूपी मदतीचा हात देण्याचे आवाहन केले़ मंत्री असताना समन्यायी पाणी वाटपास बाळासाहेब थोरात व मधुकर पिचड हे जबाबदार असल्याची तोफ पुन्हा विखे पाटील यांनी डागली़
राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुरी तालुक्याच्या दौºयाला तांदुळवाडी येथे सूर्यभान म्हसे यांच्या वस्तीपासून सुरुवात केली़ सुजय यांनी राहुरी कारखाना धाडसाने सुरू करून यशस्वीरित्या गळीत हंगाम पार पाडला़ त्यामुळे त्यांनाच सर्वांनी मतदान करावे, अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली़ यावेळी सुधाकर कटारे, उत्तम म्हसे, इंद्रभान पेरणे, शरद पेरणे आदी उपस्थित होते़
आरडगाव येथील गोपीनाथ काळे यांच्यावस्तीवर विखे पाटील यांची बैठक वजा सभा झाली़ यावेळी दिलीप इंगळे, किरण बोरावके, दीपक काळे, रमेश वने, विक्रम तांबे, साहेबराव म्हसे, रवींद्र म्हसे, शिवाजी डौले आदी उपस्थित होते़ मानोरी येथे बाळासाहेब वाघ यांच्या वस्तीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक घेतली़ वळण येथे दत्ता खुळे यांच्या वस्तीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़
केंदळ खुर्द येथे अनिल आढाव यांच्या वस्तीवर विखे पाटील यांनी बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला़ ब्राम्हणी येथे भारत तारडे यांच्या वस्तीवर जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणुकीचे नियोजन योग्य पध्दतीने करण्याचे आवाहन केले़ उंबरे येथे राधाकृष्ण विखे पाटील यांचे व्याही नामदेव ढोकणे यांच्या वस्तीवर बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मत जाणून घेतली. पिंप्री येथे विजय कांबळे यांच्या वस्तीवर जमलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले़
तमनर आखाडा येथे विजय तमनर यांच्या वस्तीवर जमलेल्या कार्यकर्त्यांना राधाकृष्ण विखे यांनी मार्गदर्शन करून जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्याचे आवाहन केले़ सडे, डिग्रस व वरवंडी येथेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठका घेऊन कार्यकर्त्यांनी प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन केले़

Web Title: Suhayi Ratchuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.