Radhakrishna Vikhe visit to take the Chief Minister Fadnavis: in Shrirampur | मुख्यमंत्री फडणवीस घेणार राधाकृष्ण विखेंची भेट : थोड्याच वेळात श्रीरामपूरात
मुख्यमंत्री फडणवीस घेणार राधाकृष्ण विखेंची भेट : थोड्याच वेळात श्रीरामपूरात

अहमदनगर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूरमध्ये सभा घेणार आहेत. त्यासाठी ते थोड्याच वेळात श्रीरामपूरमध्ये दाखल होणार आहेत.
या सभेपुर्वी ते राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार आहेत. तसेच काँग्रेसचे करण ससाणे यांच्या घरी ही भेट होणार असल्याचे समजते. त्यांच्यासमवेत जलसंपदामंत्री गिरीष महाजन हेही असणार आहेत. कालच राधाकृष्ण विखे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा स्विकारला असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. तर करण ससाणे यांचाही काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे.
त्यामुळे या सर्व राजकिय पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

 


Web Title: Radhakrishna Vikhe visit to take the Chief Minister Fadnavis: in Shrirampur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.