शिर्डी मतदारसंघात 174 मतदान केंद्रावरुन लाईव्ह वेबकास्टिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 06:08 PM2019-04-25T18:08:23+5:302019-04-25T18:09:53+5:30

शिर्डी लोकसभा निवडणुकीत लाईव्ह वेबकास्टिंगसाठी यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे.

Live Webcasting from 174 polling stations in Shirdi constituency | शिर्डी मतदारसंघात 174 मतदान केंद्रावरुन लाईव्ह वेबकास्टिंग

शिर्डी मतदारसंघात 174 मतदान केंद्रावरुन लाईव्ह वेबकास्टिंग

googlenewsNext

शिर्डी : शिर्डी लोकसभा निवडणुकीत लाईव्ह वेबकास्टिंगसाठी यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाकडून नविन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात 174 मतदान केंद्रावरुन मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. मतदान केंद्राचा परिसर इलेक्ट्रॉनिक देखरेखीखाली येणार आहे. त्यानुसार ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. मतदान केंद्र परिसरातील सर्व हालचाली निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून पाहता येणार आहेत.
शिर्डी मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होत आहे. जिल्हा निवडणुक अधिकारी राहुल व्दिवेदी, अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात 1 हजार 710 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी 174 मतदान केंद्रावर लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. यामध्ये अकोले 31, संगमनेर 28, शिर्डी 30, कोपरगाव 27, श्रीरामपूर 31, नेवासा 27 या मतदान केंद्रावरून मतदान प्रक्रियेचे लाईव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.

Web Title: Live Webcasting from 174 polling stations in Shirdi constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.