Highest voter turnout in Akurdi in Shirdi constituency while lowest in Nevasa is | शिर्डी मतदारसंघात अकोलेत सर्वाधिक मतदान तर नेवासेमध्ये सर्वात कमी

शिर्डी मतदारसंघात अकोलेत सर्वाधिक मतदान तर नेवासेमध्ये सर्वात कमी

श्रीरामपूर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ४५.४३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. अकोले तालुक्यात मतदारांमध्ये सर्वाधिक उत्साह दिसून आला. नेवासे तालुक्यात तुलनेने काही अंशी कमी मतदान झाले. असे असले तरी दुपारी उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर मतदानात वाढ होईल असा अंदाज आहे.
सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरवात झाली. नऊ वाजेनंतर मतदान केंद्रांसमोर मोठ्या रांगा दिसून आल्या. विशेष म्हणजे या खेपेला सर्वच राजकीय पक्षांकडून मतदान घडवून आणण्याकरिता लागणाऱ्या यंत्रणेचा अभाव दिसून आला. मात्र तरीही मतदार स्वयंस्फुतीर्ने मतदान केंद्रांवर गेले. सकाळी नऊ वाजता अनेक केंद्रांवर रांगा दिसून आल्या. महिला व पुरुषांचा बरोबरीने यात सहभाग होता.
अकोले तालुक्यात दुपारी तीन वाजेपर्यंत ४७ टक्के मतदान नोंदविले गेले. त्या खालोखाल संगमनेर (४५.३९), शिर्डी (४५.६७), कोपरगाव (४५.७७), श्रीरामपूर (४६.१२), तर नेवासेत (४२.६७) एवढे मतदान झाले. एकूण मतदारसंघात ४५.४३ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. दुपारी तीन वाजेनंतर उन्हाचा तडाखा काही अंशी कमी होईल. यानंतर पाच वाजेपर्यंत मतदानात वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

Web Title: Highest voter turnout in Akurdi in Shirdi constituency while lowest in Nevasa is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.