अकोले मतदारसंघात डोंगरगाव, ढोकरी, हिवरगावगाव आंबरेत ईव्हीएम मशीन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 13:16 IST2019-10-21T12:08:40+5:302019-10-21T13:16:01+5:30
अकोले विधानसभा मतदारसंघात हिंगणगाव येथे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तर ढोकरी येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान बंद होते. हिवरगाव आंबरे येथेही मशीन बंद पडल्याने मतदारांची गैरसोय झाली.

अकोले मतदारसंघात डोंगरगाव, ढोकरी, हिवरगावगाव आंबरेत ईव्हीएम मशीन बंद
अकोले : अकोले विधानसभा मतदारसंघात हिंगणगाव येथे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तर ढोकरी येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान बंद होते. हिवरगाव आंबरे येथेही मशीन बंद पडल्याने मतदारांची गैरसोय झाली.
अकोले तालुक्यात सकाळी पावसाने विश्रांती दिल्याने उत्साहात मतदान सुरू झाले. सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत अकोलेत १८.१९ टक्के मतदान झाले होते. तर कोतूळ येथे २२ टक्के, भंडारदरा येथे २० टक्के मतदान झाले होते.
डोंगरगाव येथे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ईव्हीएम यंत्र १५ ते २० मिनीटे बंद पडले होते. ढोकरी येथे ही ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान यंत्र पडले होते. बंद पडलेल्या मतदान यंत्रावर पुन्हा मतदान घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. हिवरगाव आंबरे येथे ११.३० वाजेपर्यंत ईव्हीएम मशीन बंदच होते. यामुळे मतदार मतदानाच्या प्रतीक्षेत होते.