The cane harvest worker who went to wash the bull drowns in the container | बैल धुण्यासाठी गेलेल्या ऊस तोडणी कामगाराचा प्रवरा पात्रात बुडून मूत्यू

बैल धुण्यासाठी गेलेल्या ऊस तोडणी कामगाराचा प्रवरा पात्रात बुडून मूत्यू

कळस : प्रवरा नदीपात्रात बैल धुण्यासाठी गेलेल्या कृष्णा वाळू मेंगाळ (वय २१, रा. जपेडकवाडी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) तरूणाचा बुडून मृत्यू झाला. २५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रूक येथे ही घटना घडली.
    अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा ऊस तोडणी हंगाम बंद झाल्याने ऊस तोडणी कामगार आपल्या गावाकडे जाणार आहेत . बैल धुण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे.    कृष्णा वाळू मेंगाळ हा तरुण बैल धुण्यासाठी प्रवरा नदीपात्रात गेला होता. २५ मार्च रोजी दुपारी सुगाव बुद्रुक येथील प्रवरा नदीपात्रात तो बुडाला होता. त्याचा शोध घेत असताना २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नदीपात्रात तरंगताना आढळून आला.
पोलीस पाटील राजेंद्र शिंदे यांच्या माहितीवरून अकोले पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे याच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र कोरडे, संदीप पांडे, धनंजय गुडवाल हे करीत आहेत.

Web Title: The cane harvest worker who went to wash the bull drowns in the container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.