BJP assaulted Booth: Crime filed | भाजपचे बुथ लावल्याने मारहाण : गुन्हे दाखल

भाजपचे बुथ लावल्याने मारहाण : गुन्हे दाखल

केडगाव : लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचे बुथ का लावले, असे म्हणून एकाला स्कार्पिओमधून आलेल्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत परशुराम अशोक वाघ हे जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता शिराढोण येथील वेशीजवळ ही घटना घडली. राजकीय वादातून झालेल्या या घटनेमुळे नगर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात सुनील उर्फ सोनू दरेकर, धनंजय दरेकर, अनील दरेकर, दिनेश उर्फ बंटी दरेकर, गणेश दरेकर, रमेश (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. शिराढोण, ता. नगर) यांच्याविरुद्ध मारहाण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रात्री साडेअकरा वाजता स्कार्पिओमधून राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आले. त्यांनी परशुराम यांना लोकसभा निवडणुकीत भाजपचे बुथ का लावले? मतदान प्रतिनिधी म्हणून काम का पाहिले, असे म्हणून मारहाण सुरू केली. या मारहाणीत जखमी ते झाले आहेत.

Web Title: BJP assaulted Booth: Crime filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.