शिर्डी लोकसभा मतदारसंघात 9 सखी मतदान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 05:19 PM2019-04-25T17:19:26+5:302019-04-25T17:19:33+5:30

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे.

9 Sakhi polling stations in Shirdi Lok Sabha constituency | शिर्डी लोकसभा मतदारसंघात 9 सखी मतदान केंद्र

शिर्डी लोकसभा मतदारसंघात 9 सखी मतदान केंद्र

googlenewsNext

शिर्डी : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. महिलांचा सहभाग असलेल्या या केंद्राला सखी मतदान केंद्र असे म्हटले जाणार आहे. अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा विधानसभा क्षेत्रात 9 मतदान केंद्रांवर महिलाराज राहणार आहे. या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचारी सांभाळणार आहेत. मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबध्दतेचा भाग म्हणून या लोकसभा निवडणूकीसाठी महिलांनी चालविलेले मतदान केंद्र असणार आहे.
सखी मतदान केंद्र अधिकाधिक आकर्षक व सुंदर बनविण्यासाठी मतदान केंद्र परिसरात रांगोळी, सफाईवर विशेष भर देण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणूकीत दिव्यांग व महिला मतदारावर अधिक भर दिला आहे. त्यांना आकर्षित करण्यासाठी सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार सखी मतदान केंद्र स्थापन करण्याचे आदेश असल्याने महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यास मदत होणार आहे. या केंद्रावर सर्व अधिकारी व कर्मचारी महिला राहतील. प्रत्येक मतदार संघातून एका मतदान केंद्राची सखी मतदार संघ म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघात 9 मतदान केंद्राचा समावेश करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सखी केंद्र
- मतदान केंद्र क्र. 128 अकोले, अगस्ती विद्यालय अकोले
- मतदान केंद्र क्र. 129 अकोले, अगस्ती विद्यालय अकोले
- मतदान केंद्र क्र. 155 पी. जे. आंबरे पाटील कन्या विद्यालय संगमनेर
- मतदान केंद्र क्र. 90 शारदा विद्या मंदिर राहाता
- मतदान केंद्र क्र. 60 जिल्हा परिषद शाळा पिंपळवाडी
- मतदान केंद्र क्र. 100 नवीन म. अ. कार्यालय कोपरगाव
- मतदान केंद्र क्र. 128 डॉ. सी.एम. मेहता कन्या विद्या मंदिर कोपरगाव
- मतदान केंद्र क्र. 115 डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर
- मतदान केंद्र क्र. 49 सुंदरबाई गांधी कन्या विद्यालय नेवासा खुर्द

Web Title: 9 Sakhi polling stations in Shirdi Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.