येवला, कोपरगाव सिमेवर फिरणा-यांना पोलिसांकडून चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 13:58 IST2020-05-08T13:58:02+5:302020-05-08T13:58:42+5:30
कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथे कोरोना संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणा-या तरुणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला.

येवला, कोपरगाव सिमेवर फिरणा-यांना पोलिसांकडून चोप
शिरसगाव : कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथे कोरोना संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणा-या तरुणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला.
कोपरगाव ग्रामीण भागाचे बिट हवालदार संजय पवार व त्यांच्या कर्मचा-यांनी कोपरगाव, वैजापूर या महामार्गावर अनेक जण विनाकाम फिरत असतात. त्यांनी तोंडाला मास्क देखील लावलेले नसते. अशा लोकांना पोलिसांनी चोप दिला. तर शिरसगाव येथील शिरसगाव-सावळगाव ग्रुप ग्रामपंचायतीने मास्क न वापरणा-या ग्रामस्थांकडून १०० रुपये दंड वसूल केला आहे.
कोपरगाव तालुक्यातील सावळगाव व येवला तालुक्यातील दुगलगाव या दोन गावांच्या सीमेवरचा रस्ता बंद करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. याप्रसंगी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे, कोपरगाव ग्रामीण भागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, शिरसगावचे उपसरपंच इरफान पटेल, सदस्य कैलास मढवे, विनोद भागवत, ज्ञानदेव भागवत, शिरसगावचे ग्रामस्थ विलास साळवे, राजू पटेल उपस्थित होते.