Lok Sabha Election 2019 : खासदार गांधी यांची लोकसभेत 67% उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 14:46 IST2019-04-11T14:42:17+5:302019-04-11T14:46:43+5:30
खासदार दिलीप गांधी यांची लोकसभेत अधिवेशन काळात ६७ टक्के उपस्थिती राहिली. अशी माहिती पीआरएस लेजिस्लेटीव्ह रिसर्च संस्थेच्या आकडेवारीवरून मिळाली आहे.

Lok Sabha Election 2019 : खासदार गांधी यांची लोकसभेत 67% उपस्थिती
अहमदनगर : खासदार दिलीप गांधी यांची लोकसभेत अधिवेशन काळात ६७ टक्के उपस्थिती राहिली. अशी माहिती पीआरएस लेजिस्लेटीव्ह रिसर्च संस्थेच्या आकडेवारीवरून मिळाली आहे. खासदार गांधी हे सन १९९९ मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. २०१४ मध्ये ते तिसऱ्यांदा खासदार आहेत. त्यांच्या कामगिरीचा हा आढावा
37 वेळा चर्चांमध्ये सहभाग घेतला. सर्व खासदारांच्या सरासरीचा विचार करता हे प्रमाण ६७ टक्के एवढे राहिले आहे. दरम्यान, असे असले तरी खासगी विधेयके मांडण्यात मात्र त्यांची कामगिरी सरासरीच्या जवळपास आहे. त्यांनी दोन विधेयके सादर केली. त्याची राष्ट्रीय सरासरी अवघी २.३ टक्के राहिली आहे.
314 प्रश्न उपस्थित केले. या आघाडीवरही ते सरस ठरले आहेत. राष्ट्रीय सरासरी ही २९३ एवढी आहे. कृषी, ग्रामीण विकास, उद्योग, आरोग्य, शहरी विकास आदी प्रश्नांवर चर्चा.
70% एवढाच निधी विद्यमान खासदारांनी खर्च केल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. ही आकडेवारी २५ जानेवारी २०१९ पर्यंतची आहे.
वय : ६८
शिक्षण : दहावी
टर्म : तिसरी
कोणते व किती प्रश्न उपस्थित केले?
आर्थिक 4 %
कृषी 4 %
संरक्षण 3%
रोजगार 4%
पर्यावरण 2%
ऊर्जा 0%
रेल्वे 8%
शिक्षण 3%
आरोग्य 5%
सामाजिक न्याय 1%
इतर 68 %