कर्जतमधून रोहित पवार, पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे निलेश लंके, नगरमध्ये संग्राम जगताप आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 08:56 IST2019-10-24T08:55:33+5:302019-10-24T08:56:35+5:30
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील अहमदनगर, पारनेर, जामखेड मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार आघाडीवर आहेत.

कर्जतमधून रोहित पवार, पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे निलेश लंके, नगरमध्ये संग्राम जगताप आघाडीवर
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील अहमदनगर, पारनेर, जामखेड मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार आघाडीवर आहेत.
पारनेर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी सेनेचे आमदार विजय औटी यांच्यावर ५१४ मतांची आघाडी मिळविली आहे.
कर्जत-जामखेड मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रसचे रोहित पवार यांनी आघाडी मिळविली आहे. पहिल्या फेरीत तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. पालकमंत्री राम शिंदे हे पिछाडीवर आहेत.
अहमदनगर शहर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप हे ६२७ मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात सेनेचे अनिल राठोड हे पिछाडीवर आहेत. जामखेड-कर्जत मतदार संघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.