काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भरला उमेदवारी अर्ज
By शेखर पानसरे | Updated: October 29, 2024 14:50 IST2024-10-29T14:49:41+5:302024-10-29T14:50:06+5:30
थोरात यांच्यासमवेत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे-पाटील हे देखील उपस्थित होते.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भरला उमेदवारी अर्ज
शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी (दि.२९) काँग्रेस पक्षाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. येथील प्रांत कार्यालयात जाऊन त्यांनी अर्ज भरला आहे. त्यांच्यासमवेत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे-पाटील हे देखील उपस्थित होते.
जाणता राजा मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक आणि प्रक्रिया संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) संपर्कप्रमुख नरेश माळवे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुका प्रमुख संजय फड, माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, दिलीप साळगट, काँग्रेस तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामहरी कातोरे आदी उपस्थित आहेत.