२० डिसेंबरपासून अण्णांचे मौन; निर्भयाला न्याय देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 17:29 IST2019-12-09T17:29:08+5:302019-12-09T17:29:31+5:30
दिल्लीतील निर्भया प्रकरण गेल्या सात वर्षापासून प्रलंबित आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होऊन निर्भयाला न्याय मिळावा, यासाठी २० डिसेंबरपासून मौन धारण करणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.

२० डिसेंबरपासून अण्णांचे मौन; निर्भयाला न्याय देण्याची मागणी
पारनेर : दिल्लीतील निर्भया प्रकरण गेल्या सात वर्षापासून प्रलंबित आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होऊन निर्भयाला न्याय मिळावा, यासाठी २० डिसेंबरपासून मौन धारण करणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. हजारे यांनी याबाबतचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.
देशभर सध्या घडत असलेल्या अत्याचाराच्या घटना अस्वस्थ करणाºया आहेत. अत्याचाराच्या घटनांमध्ये आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हायला हव्यात. वर्षानुवर्षे आरोपींना शिक्षा होत नसल्याने असे गुन्हे करणारांचे मनोबलही वाढते. सात वर्षापूर्वी दिल्ली येथे निर्भयावर अत्याचार झाला होता. त्यानंतर संपूर्ण देशात आंदोलने झाली होती. अद्यापही निर्भया न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. याशिवाय देशभर घडलेल्या इतर अशाच अनेक घटनातील आरोपींनाही कठोर शासन होणे अपेक्षित आहे. हैदराबाद येथे घडलेली अत्याचाराची घटनाही काळीमा फासणारी आहे. निर्भयासारख्या प्रकरणात लवकर न्याय मिळत नसल्याने हैदराबाद एन्काउंटरला जनतेचा पाठिंबा मिळतो, असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे.