टेंभुर्णी : उजनी धरणाचा पाणलोट क्षेत्रात गेल्या माहिन्यापासून सातत्याने पाऊस पडत असून, परिणामी यावर्षी उजनी प्रथमच जून महिन्याचा पहिल्या आठवड्यात ५० टक्के भरले आहे, तर उजनी धरणाचापाणीसाठा ९० टीएमसीचा पुढे झाला आहे.
उजनी पाणलोट क्षेत्रातील भीमा खोऱ्यात पुणे जिल्हा, मावळ भाग, लोणावळ्याचा पश्चिम भाग व भीमाशंकरच्या डोंगर रांगांत मुसळधार पाऊस होत आहे.
पुणे येथील बंडगार्डन येथून सायंकाळी पाच वाजता १४ हजार ५०० कुसेक विसर्ग सुरू असून, सकाळपर्यंत दौंड येथील विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
२५ हजार कुसेक पुढे जाऊ शकतो. सध्या दौंड येथील विसर्ग कायम असून, ११ हजार ७१९ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे.
गतवर्षीचा तुलनेत दीड महिना अगोदर उजनी ५० टक्के भरले आहे. गेल्या वर्षी ३१ जुलैला उजनी धरणाची पाणीपातळी ५० टक्के झाली होती.
यावर्षी उजनी परिसरात अवकाळी पावसामुळे जून महिन्याचा पहिल्याच पंधरवड्यात उजनी ५० टक्के भरले आहे. १८ मे पासून उजनी धरणाची पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झाली होती.
वजा २३ टक्केपर्यंत खाली गेलेले उजनी २७ मे रोजी मृत साठ्यातून बाहेर आले होते, तर ५० टक्के भरण्यासाठी २० दिवस लागले.
सध्या उजनी धरणात एकूण ९०. ३० टीएमसी पाणीसाठा असून, २६.६४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. १८ मे पासून ४२ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.
२०२३ मध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने ३ ऑक्टोबरला ५० टक्के भरले होते, तर यावर्षी १६ जूनला उजनी ५० टक्के भरले आहे.
उजनी धरणाचा इतिहासात मृत साठ्यात गेलेले उजनी जून महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात प्रथमच ५० टक्के भरले आहे.
गेल्या पाच वर्षांतील उजनी ५० टक्के झालेली आकडेवारी१७ ऑगस्ट २०२०१ ऑगस्ट २०२११९ जुलै २०२२३ ऑक्टोबर २०२३३१ जुलै २०२५ रोजी पन्नास टक्के भरले होते.
अधिक वाचा: औषध फवारणीसाठी मजुरांची समस्या आहे अन् पैशाची बचत करायचीय मग वापरा हे तंत्र