Lokmat Agro >हवामान > यंदा रब्बी हंगामातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला; उजनीसह ७ प्रकल्पांत झाला जास्तीचा पाणीसाठा

यंदा रब्बी हंगामातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला; उजनीसह ७ प्रकल्पांत झाला जास्तीचा पाणीसाठा

This year the problem of agricultural water during the Rabi season has been solved; Additional water storage in 7 projects including ujani dam | यंदा रब्बी हंगामातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला; उजनीसह ७ प्रकल्पांत झाला जास्तीचा पाणीसाठा

यंदा रब्बी हंगामातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला; उजनीसह ७ प्रकल्पांत झाला जास्तीचा पाणीसाठा

ujani dam water level सोलापूर जिल्ह्यात उजनीसह सात मध्यम व ५६ लघु प्रकल्प असून उजनी धरणात एकूण ३२८३.२० दशलघ एकूण पाणीसाठा असून ११५.९३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

ujani dam water level सोलापूर जिल्ह्यात उजनीसह सात मध्यम व ५६ लघु प्रकल्प असून उजनी धरणात एकूण ३२८३.२० दशलघ एकूण पाणीसाठा असून ११५.९३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

शेअर :

Join us
Join usNext

टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्यात उजनीसह सात मध्यम व ५६ लघु प्रकल्प असून उजनी धरणात एकूण ३२८३.२० दशलघ एकूण पाणीसाठा असून ११५.९३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. सात मध्यम प्रकल्पांत एकूण ६.४५ टीएमसी पाणीसाठा आहे.

गतवर्षी देखील उजनी धरणात ११३. ४८ टीएमसी पाणीसाठा होता. जिल्ह्यातील पाणीसाठ्याची सध्याची स्थिती चांगली आहे. यावर्षी निम्मा पावसाळा संपला असला तरी आणखी दोन महिने शिल्लक असल्याने गतवर्षीपेक्षा चांगली स्थिती आहे.

सध्याच्या खरीप व रब्बी हंगामात देखील शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. उजनी समांतर जलवाहिनी सुरू झाल्याने उजनीत शेतीसाठी उपयुक्त असलेला पाणीसाठा ५३.६३ टीएमसी असतो.

मध्यम प्रकल्पाची स्थिती (टीएमसी)
एकरुख : १.६९
हिंगणी : १.६२
जवळगाव : ०.७७
मांगी : ०.६१
आष्टी : ०.५१
बोरी : ०.८२
पिंपळगाव ढाळे : ०.४४
एकूण : ६.४५

७ प्रकल्पांतील पाणीसाठा
हिंगणी, पिंपळगाव ढाळे व बोरी हे प्रकल्प शंभर टक्के भरले असून, एकरुख व ८० टक्के भरले आहे, तर जवळगाव ५४.५१, मांगी ५६.९७, आष्टी ६३.१५ टक्के या सात मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा सरासरी ७६.४१ टक्के भरलेले आहेत. गतवर्षी १ ऑगस्ट २४ रोजी सरासरी २९.१६ टक्के भरलेले होते.

५६ लघु प्रकल्पाची स्थिती
जिल्ह्यातील एकूण ५६ लघु प्रकल्पांपैकी २७ प्रकल्प अजूनही कोरडे असले तरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूर, हमणगाव, अक्कलकोट बोरगाव, बार्शी तालुक्यातील वैराग, माढा तालुक्यातील निमगाव हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. सर्व प्रकल्पांत एकूण सरासरी ४२.८३ दशलघ पाणीसाठा आहे. गतवर्षी १ ऑगस्ट रोजी सरासरी ४२.०५ दशलघ पाणीसाठा होता.

उन्हाळ्यातील शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटला
उजनी धरणाची स्थिती गतवर्षी सारखीच असून धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे पुढील उन्हाळ्यातील शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

अधिक वाचा: मागील गाळप हंगामासाठी या साखर कारखान्याने उसाचा अंतिम हप्ता केला जाहीर

Web Title: This year the problem of agricultural water during the Rabi season has been solved; Additional water storage in 7 projects including ujani dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.