Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मागील तीन दिवसांपासून अवकाळी आणि गारपीट झाल्याने उन्हाळी पिकांचे, फळबागा आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (unseasonal rain)
आज (८ मे) पासून संपूर्ण महाराष्ट्रात केवळ गारपीटीचा धोका कमी होण्याची शक्यता जाणवते. तर संपूर्ण कोकणातील व मध्य महाराष्ट्रातील (७+१०) सतरा जिल्ह्यात मात्र, अवकाळी पावसाची शक्यता रविवार (११ मे) पर्यंत टिकून राहण्याची शक्यता कायम आहे. (unseasonal rain)
विशेषतः कमी अधिक प्रमाणात, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर ह्या ९ जिल्ह्यात मात्र अवकाळीचा प्रभाव हा असाच टिकून राहील, असा अंदाज आहे.(unseasonal rain)
कमाल तापमान व दुपारची ताप
अवकाळीच्या वातावरणामुळे, कोकण वगळता परंतु मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ डिग्रीने घट झाली आहे. त्यामुळे उन्हाची ताप विशेष जाणवत नाही.
विशेषतः खालील ठिकाणचे दुपारचे कमाल तापमाने ही सरासरीपेक्षा जळगांव ४.८, वर्धा ४.५, परभणी ३.९, अमरावती ३.७, चंद्रपूर ३.६, नागपूर ३.४, छ. सं. नगर ३.२, डिग्रीने खालावलेले आहे.
किमान तापमान व रात्रीच्या उकाड्या पासूनची सुटका
अवकाळीच्या वातावरणामुळे, संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन ते सहा डिग्रीने घट झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या उकाड्यापासून दिलासा मिळत आहे.
विशेषतः खालील ठिकाणचे पहाटेच्या किमान तापमाने ही सरासरीपेक्षा, चंद्रपूर वगळता संपूर्ण विदर्भ ४ ते ६, धाराशिव वगळता संपूर्ण मराठवाडा ३ ते ५, जळगांव ६.५, अलिबाग ५.८, डहाणू ५.२, मुंबई कुलाबा ३.७, सांतक्रूझ २.४ डिग्रीने, खालावलेले आहे. महाराष्ट्रातील तापमानाची स्थिती ही सोमवार (१२ मे) म्हणजे बुद्ध पौर्णिमेपर्यंत अशीच टिकून राहील, असे वाटते.
- माणिकराव खुळे
Meteorologist(Retd)
IMD Pune