Vidarbha Heatwave Alert : राज्यातील बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असताना, आता काही भागांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Vidarbha Heatwave Alert)
मात्र,विदर्भातील परिस्थिती अद्याप गंभीर असून, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. (Vidarbha Heatwave Alert)
पुढील पाच दिवस विदर्भात तापमान ४५ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.(Vidarbha Heatwave Alert)
यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी कमाल तापमान ४५.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे रात्रीचे तापमानही चिंताजनकरीत्या वाढले असून, ३१.६ अंश तापमानाची नोंद झाली. (Vidarbha Heatwave Alert)
यंदाच्या उन्हाळ्यातील ही सर्वाधिक उष्ण रात्र ठरली आहे. त्यामुळे दिवसा तर उकाडा वाढलाच आहे, पण रात्रीही नागरिकांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे.(Vidarbha Heatwave Alert)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १९ मे रोजी कमाल तापमान ४४.७ अंश, तर किमान तापमान ३२.८ अंश राहील.
२० मे रोजी दिवसाचे तापमान ४५.२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून, रात्रीचा पारा ३३.७ अंशांवर पोहोचू शकतो. २१ आणि २२ मे रोजीदेखील तापमान ४५ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
उष्ण रात्रीमुळे वाढला त्रास
यंदा विदर्भात रात्रीचे तापमानही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सामान्यतः २० ते २७ अंशांच्या दरम्यान राहणारे रात्रीचे तापमान आता ३३ अंशांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे कुलर, पंखे आणि एसी सुरू असतानाही घरामध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे.
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा वेग आता कमी होण्यास सुरुवात होईल.
समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे स्थिर होत असल्याने पुढील काही दिवसांत राज्यातील काही भागांत तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
मान्सूनच्या हालचालींना वेग
मान्सून अंदमानात दाखल झाला असून, २६ मेच्या आसपास केरळ किनारपट्टीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यानंतर ३० मेपर्यंत तळकोकणात, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत मान्सून दाखल होऊ शकतो.
मान्सूनपूर्व वाऱ्यांमुळे तापमान कमी होण्यास मदत होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मुंबईचे कमाल तापमान सध्या ३६ ते ३८ अंशांच्या दरम्यान असून, ते पुढील काही दिवसांत ३२ अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
नागरिकांना खबरदारीचा सल्ला
उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे तसेच चहा-कॉफीऐवजी निंबूपाणी, ताक आणि नारळपाणी यांसारख्या पेयांचे सेवन करावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.
