Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Nanded water level: उष्णतेचा फटका! नांदेड विभागात जलसाठा घटतोय

Nanded water level: उष्णतेचा फटका! नांदेड विभागात जलसाठा घटतोय

latest news Nanded water level: Heatwave hits! Water levels are decreasing in Nanded division | Nanded water level: उष्णतेचा फटका! नांदेड विभागात जलसाठा घटतोय

Nanded water level: उष्णतेचा फटका! नांदेड विभागात जलसाठा घटतोय

Nanded water level: नांदेड विभागात वाढत्या उष्णतेमुळे जलसाठ्यावर गंभीर परिणाम दिसू लागला आहे. तापमान ४३°C पार गेल्याने बाष्पीभवन वाढले असून अनेक प्रकल्पांतील पाणी झपाट्याने कमी होत आहे. विशेषतः सिध्दश्वेर धरणामध्ये केवळ ११% साठा उरल्याने पाणीटंचाईचे संकट जवळ येत असल्याची चिन्हे दिसत आहेत.(Nanded water level)

Nanded water level: नांदेड विभागात वाढत्या उष्णतेमुळे जलसाठ्यावर गंभीर परिणाम दिसू लागला आहे. तापमान ४३°C पार गेल्याने बाष्पीभवन वाढले असून अनेक प्रकल्पांतील पाणी झपाट्याने कमी होत आहे. विशेषतः सिध्दश्वेर धरणामध्ये केवळ ११% साठा उरल्याने पाणीटंचाईचे संकट जवळ येत असल्याची चिन्हे दिसत आहेत.(Nanded water level)

यशवंत परांडकर

मागील महिनाभरापासून वाढलेल्या प्रचंड उष्णतेमुळे नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत येणाऱ्या विविध जलप्रकल्पांतील पाणीसाठ्यात लक्षणीय घट होत आहे.(Nanded water level)
 
तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला असून याचा थेट परिणाम जलसाठ्यावर दिसून येत आहे. (Nanded water level)

३० एप्रिल रोजीच्या अहवालानुसार मंडळातील प्रकल्पांमध्ये सरासरी ५२.३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

प्रमुख प्रकल्पांची स्थिती

नांदेड विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या मिश्र चित्र दिसत आहे.

ईसापूर प्रकल्प : ५६७.२४ दलघमी (५८.८४%) साठा

येलदरी प्रकल्प (परभणी) : ४९५.९२ दलघमी (६१.२४%) साठा

सिद्धेश्वर प्रकल्प (हिंगोली) : केवळ ९.४७ दलघमी (११.६९%) साठा — अत्यंत चिंताजनक स्थिती

विशेषतः हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्पातील साठा धोकादायक पातळीवर आला आहे.

लघु प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर

नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील लघु प्रकल्पांची स्थिती अधिकच गंभीर होत आहे.

नांदेड (मध्यम प्रकल्प) : ४१.०५% साठा

नांदेड (लघु प्रकल्प) : ३२.८६% साठा

हिंगोली (मध्यम प्रकल्प) : फक्त ६.८१% साठा

सुमारे १५ प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर असून, पुढील काळात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे.

उच्च पातळी बंधाऱ्यांची स्थिती

आमदुरा बंधारा : ५०.२२% साठा

बाभळी बंधारा (नांदेड) : १२.९४%

बाभळी बंधारा (परभणी) : ३४.७६%

वाढत्या तापमानाचा परिणाम

तापमान ४०-४३°C दरम्यान स्थिर असल्याने बाष्पीभवन वेगाने होत आहे.

यामुळे पाण्याची पातळी झपाट्याने घटते

सिंचनासाठी उपलब्धता कमी होते

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता

नांदेड पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

पाणी जपून वापरा

अनावश्यक वापर टाळा

सिंचनात बचतीच्या पद्धती वापरा

कार्यकारी अभियंते सातत्याने पाणीसाठ्याचा आढावा घेत असून संभाव्य टंचाई टाळण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.

वाढत्या उन्हामुळे नांदेड विभागातील जलसाठ्यावर मोठा ताण आला आहे. काही प्रकल्पांमध्ये साठा समाधानकारक असला तरी हिंगोलीसारख्या भागात परिस्थिती गंभीर आहे. 

योग्य नियोजन आणि पाण्याचा काटकसरीने वापर न केल्यास येत्या काळात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होऊ शकते.

हे ही वाचा सविस्तर : Heatstroke Prevention Tips : उन्हाचा तडाखा वाढला; उष्माघात टाळण्यासाठी 'हे' करा सोपे उपाय

अधिक वाचा : Humani Pest Control : शेतकऱ्यांसाठी अलर्ट! 'ही' किड पिकं उद्ध्वस्त करतेय

Web Title : नांदेड में भीषण गर्मी से जलस्तर गिरा, जलाशय सूखे

Web Summary : नांदेड मंडल में भीषण गर्मी के कारण जलाशयों में पानी तेजी से घट रहा है। हिंगोली में कुछ परियोजनाएं गंभीर रूप से निम्न स्तर पर हैं। अधिकारियों ने जल संकट से बचने के लिए सावधानीपूर्वक जल प्रबंधन का आग्रह किया है।

Web Title : Nanded Water Levels Plunge Amidst Heatwave, Reservoirs Dwindle

Web Summary : Extreme heat in Nanded Division is causing rapid water depletion in reservoirs. Some projects are critically low, especially in Hingoli. Authorities urge careful water management to avoid severe shortages. Water conservation is crucial.