Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Kukadi Left Canal : कुकडी डाव्या कालव्यातून ५०० क्युसेकने उन्हाळी पिकांसाठीचे आवर्तन सुरु

Kukadi Left Canal : कुकडी डाव्या कालव्यातून ५०० क्युसेकने उन्हाळी पिकांसाठीचे आवर्तन सुरु

Kukadi Left Canal : Circulation of 500 cusecs for summer crops begins from Kukadi Left Canal | Kukadi Left Canal : कुकडी डाव्या कालव्यातून ५०० क्युसेकने उन्हाळी पिकांसाठीचे आवर्तन सुरु

Kukadi Left Canal : कुकडी डाव्या कालव्यातून ५०० क्युसेकने उन्हाळी पिकांसाठीचे आवर्तन सुरु

येडगाव धरणातून हा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी तान्हाजी खाडे यांनी दिली. रब्बी हंगामातील पिकांसह उन्हाळी पिकांना आवर्तनाचा फायदा होणार आहे.

येडगाव धरणातून हा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी तान्हाजी खाडे यांनी दिली. रब्बी हंगामातील पिकांसह उन्हाळी पिकांना आवर्तनाचा फायदा होणार आहे.

पारनेर : कुकडी डावा कालव्याला गुरुवारी (दि. ५) सकाळी १० वाजता ५०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

येडगाव धरणातून हा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी तान्हाजी खाडे यांनी दिली. रब्बी हंगामातील पिकांसह उन्हाळी पिकांना आवर्तनाचा फायदा होणार आहे.

कुकडी डावा कालव्याला पाणी सोडल्याने फळबागांसह कांदा, ऊस, घास, कडवाळ, मका, हिरवा चारा या पिकांना जीवदान मिळणार आहे. मागील १५ दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली होती.

या भागात शेतकऱ्यांनी तातडीने पाणी सोडण्याची मागणी आमदार काशीनाथ दाते यांच्याकडे केली होती. दाते यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन कुकडी कालवा व पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी लवकर सोडण्याची मागणी केली.

मात्र, कुकडी डावा कालव्याचे पाणी नगरसह सोलापूर जिल्ह्याला मिळत असल्याने हे पाणी १० ते १५ मार्चपर्यंत सोडण्याची मागणी इतर आमदारांनी केली.

या सर्वांचा समन्वय साधत हे पाणी ५ मार्चला सोडण्याची सूचना विखे पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार हे आवर्तन सोडण्यात आले आहे.

अधिक वाचा: ऊस काटा मारीवर अंकुश ठेवण्यासाठी अखेर शासनाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर

Web Title : कुकडी लेफ्ट कैनाल: गर्मी की फसलों के लिए 500 क्यूसेक पानी छोड़ा गया।

Web Summary : येडगाँव बांध से कुकडी लेफ्ट कैनाल में 500 क्यूसेक पानी छोड़ा गया, जिससे गर्मी की फसलों को लाभ होगा। यह निर्णय किसानों की मांगों और अधिकारियों के बीच समन्वय के बाद लिया गया है, जो नगर और सोलापुर जिलों में प्याज और गन्ने जैसी फसलों को प्रभावित करने वाली हालिया पानी की कमी के मुद्दों का समाधान करता है।

Web Title : Kukadi Left Canal: Water released for summer crops at 500 cusecs.

Web Summary : Water released from Yedgaon Dam into Kukadi Left Canal at 500 cusecs benefiting summer crops. The decision follows farmers' demands and coordination among officials, addressing recent water scarcity issues affecting crops like onions and sugarcane in Nagar and Solapur districts.