Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > पुढील दोन-तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना रेड अलर्ट

पुढील दोन-तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना रेड अलर्ट

Heavy rain likely in next two-three days; Red alert for these districts | पुढील दोन-तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना रेड अलर्ट

पुढील दोन-तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना रेड अलर्ट

Maharashtra Rain Update विदर्भासह कोकण व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून, हवामानातील बदलामुळे विजांच्या कडकडाटासह वादळ, वादळी वारे ताशी ६० किमी वेगाने वाहतील.

Maharashtra Rain Update विदर्भासह कोकण व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून, हवामानातील बदलामुळे विजांच्या कडकडाटासह वादळ, वादळी वारे ताशी ६० किमी वेगाने वाहतील.

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील हवामान पालटण्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून, हवामानात होणाऱ्या बदलानुसार, शुक्रवारी रत्नागिरीला रेड, शनिवारी रायगडसह रत्नागिरीला तर रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शुक्रवारी विदर्भासह कोकण व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून, हवामानातील बदलामुळे विजांच्या कडकडाटासह वादळ, वादळी वारे ताशी ६० किमी वेगाने वाहतील.

कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

तर हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता आहे. गेल्या १५ दिवसांपासून थंडावलेला मान्सून सक्रिय होईल. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्येही १९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

अधिक वाचा: शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा; पीकविमा योजनेचा शेवटचा हप्ता लवकरच

Web Title: Heavy rain likely in next two-three days; Red alert for these districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.