निरा खोऱ्यातील प्रमुख जलस्रोत असलेल्या वीर, भाटघर आणि नीरा देवघर या तीनही धरणांमध्ये जोरदार पावसामुळे १०० टक्के जलसाठा झाला आहे.
यामुळे सोलापूर, सातारा, पुणे परिसरातील शेतकरी आणि रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या वर्षीच्या पावसामुळे या तिन्ही धरणांची जलसाठा संपूर्ण क्षमतेने भरून गेलेला आहे.
विशेषतः वीर धरणातून सध्या दर सेकंदाला ७२८७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, ज्यामुळे या भागातील शेतीसाठी तसेच घरगुती पिण्याच्या पाण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे.
नीरा खोऱ्याची शेती मुख्यत्वे या धरणांमधील पाण्यावर अवलंबून असते. या पाण्याच्या उपलब्धतेमुळे रब्बी हंगामासाठी सिंचनाचा मार्ग खुला झाला आहे आणि शेतकऱ्यांना पीक वाटपासाठी आवश्यक असलेली पाणी उलब्धता झाली आहे.
अधिक वाचा: अंदोरीतील शेतकऱ्याला घेवड्याने केले लखपती; एकरात पावणेतीन लाखांचे उत्पन्न