Join us

राज्यातील धरणे ९० टक्के भरली; कोणत्या विभागात झाला किती पाणीसाठा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 09:27 IST

बुधवारी राज्यातील पावसाचा जोर ओसरला असून, राज्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या सर्वदूर पावसामुळे राज्यातील बहुतांशी जलसाठे ओव्हरफ्लो झाले आहेत.

बुधवारी राज्यातील पावसाचा जोर ओसरला असून, राज्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या सर्वदूर पावसामुळे राज्यातील बहुतांशी जलसाठे ओव्हरफ्लो झाले आहेत.

राज्यात १ जूनपासून २० ऑगस्टपर्यंत पडणाऱ्या सामान्य पावसापेक्षा ७% अधिक पाऊस झाला. दोन दिवसात १३८ मोठ्या धरणातील सरासरी पाणीसाठ्यात २.३० टक्के वाढ झाली असून, धरणे ९० टक्के भरली आहेत.

त्यातून विसर्ग सुरू केल्याने पंचगंगा, कोयना, कृष्णा, गोदावरी, चंद्रभागा, नीरा, प्रवरा, गिरणा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गतवर्षाच्या तुलनेत नागपूर विभागात अद्याप जलसाठ्यांमध्ये १०% कमतरता आहे.

विभागनिहाय जलसाठाविभाग - मोठी धरणे - जलसाठानागपूर - १६ - ६७%नाशिक २२ - ८३%अमरावती - १० - ८५%छ. संभाजीनगर - ४४ - ८९%पुणे - ३५ - ९५%कोकण - ११ - ९५%

कृष्णा, कोयना, पंचगंगा, गोदावरी चंद्रभागेला पूर◼️ गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पूर पाण्याची आवक होत असल्यामुळे दुपारी चार वाजेपर्यंत ६ हजार ३४० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरीत करण्यात आला. गोदावरीला पूर आला आहे.◼️ पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, पवना, नीरा नद्यांना पूर आल्याने उजनी धरणातून भीमा नदीत दीड लाख क्यूसेकचा विसर्ग सोडण्यात आल्याने पंढरपुरातील दोन पूल पाण्याखाली गेले आहेत.

अधिक वाचा: आटपाडीच्या यशवंतचे डाळिंब परदेशात रवाना; माळरानावरील ५०० झाडांनी दिले २५ लाखांचे उत्पन्न

टॅग्स :धरणपाणीमहाराष्ट्रपाऊसनदीपुणेनाशिकअमरावतीकोकणनागपूरकोयना धरणपंढरपूर