Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Ujani Dam Water Level : उजनीतून भीमेत विसर्ग कायम धरणाची पाणीपातळी स्थिर

Ujani Dam Water Level : उजनीतून भीमेत विसर्ग कायम धरणाची पाणीपातळी स्थिर

Ujani Dam Water Level: The water level of the dam is constant from Ujani to Bhima | Ujani Dam Water Level : उजनीतून भीमेत विसर्ग कायम धरणाची पाणीपातळी स्थिर

Ujani Dam Water Level : उजनीतून भीमेत विसर्ग कायम धरणाची पाणीपातळी स्थिर

पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरून येणाऱ्या पावसाचा पाण्यात घट झाल्याने दौंड येथील विसर्गात घट झाली आहे. तर उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग कायम आहे.

पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरून येणाऱ्या पावसाचा पाण्यात घट झाल्याने दौंड येथील विसर्गात घट झाली आहे. तर उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग कायम आहे.

टेंभुर्णी : पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरून येणाऱ्या पावसाचा पाण्यात घट झाल्याने दौंड येथील विसर्गात घट झाली आहे. तर उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग कायम आहे.

दौंड येथून ६६ हजार ६३१ क्युसेक विसर्ग येत असून, उजनीतून भीमा नदीत ८१ हजार ६०० क्युसेक विसर्ग कायम आहे. सोमवारी रात्री दौंड विसर्ग ९४ हजार क्युसेकपर्यंत पोहोचला होता.

मंगळवार सकाळपासून दौंड विसर्गात घट होत गेली. तर उजनी पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदीत ८० हजार क्युसेक विसर्ग कायम आहे. वीज निर्मितीसाठी धरणातून भीमा नदीत १ हजार ६०० असा ८१ हजार ६०० क्युसेक विसर्ग भीमा नदीत सुरू आहे.

सध्या उजनी धरणाची पाणी पातळी १०७.४० टक्के असून, १२१.२० एकूण पाणीसाठा आहे. तर ५७.५३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. उजनी धरण परिसरात जूनपासून ३८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सध्या उजनीतून मुख्य कालवा १ हजार ६०० क्युसेक, भीमा-सीना जोड कालवा २०० क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजना १७५ क्युसेक, दहिगाव ८० क्यूसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.

Web Title: Ujani Dam Water Level: The water level of the dam is constant from Ujani to Bhima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.