Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा 'या' कारणाने होणार फायदा; मागील ५ वर्षाच्या तुलनेत दरात मोठी वाढ

हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा 'या' कारणाने होणार फायदा; मागील ५ वर्षाच्या तुलनेत दरात मोठी वाढ

Turmeric farmers will benefit this year due to 'this' reason; Big increase in price compared to the last 5 years | हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा 'या' कारणाने होणार फायदा; मागील ५ वर्षाच्या तुलनेत दरात मोठी वाढ

हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा 'या' कारणाने होणार फायदा; मागील ५ वर्षाच्या तुलनेत दरात मोठी वाढ

halad market sangli कधी काळी जगातील हळदीचे दर ठरवणारी सांगलीची ऐतिहासिक हळदपेठ आता आवकेअभावी चिंतेत सापडली आहे.

halad market sangli कधी काळी जगातील हळदीचे दर ठरवणारी सांगलीची ऐतिहासिक हळदपेठ आता आवकेअभावी चिंतेत सापडली आहे.

अशोक डोंबाळे
सांगली : कधी काळी जगातील हळदीचे दर ठरवणारी सांगलीची ऐतिहासिक हळदपेठ आता आवकेअभावी चिंतेत सापडली आहे.

शंभर वर्षांहून अधिक परंपरा लाभलेल्या या बाजारपेठेत गेल्या पाच वर्षांत राजापुरी हळदीची तब्बल १३ लाख ७५ हजार क्विंटलने आवक घटली आहे.

२०२१-२२ मध्ये १९ लाख १३ हजार क्विंटल असलेली आवक २०२५-२६ मध्ये केवळ पाच लाख ३७ हजार क्विंटलवर आली आहे.

सांगली मार्केट यार्डात दहा वर्षांपूर्वी वर्षाला १७ ते १८ लाख क्विंटल हळद दाखल होत होती आणि हजार कोटींपेक्षा अधिक उलाढाल होत होती.

मात्र, महापुरामुळे नष्ट झालेली नैसर्गिक साठवणूक व्यवस्था, हळदीवरील जीएसटी, कोरोनानंतर व्यापारातील मंदावलेला वेग हेही एक कारण आहे

तसेच नांदेड, हिंगोली, बार्शी, सातारा (महाराष्ट्र), दुग्गीराळा, निजामाबाद, कडप्पा (आंध्र प्रदेश), कर्नाटकमध्ये उभारलेली नवीन खरेदी केंद्रामुळे सांगलीच्या बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे, असे सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले.

सांगली मार्केट यार्डात परपेठ हळदीची आवकही दोन लाख ९३ हजार क्विंटलवरून एक लाख ७१ हजार क्विंटलपर्यंत खाली आली आहे.

हळदीची आवक कमी झाली असली तरी बाजारातील मागणी वाढल्याने हळदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २०२१-२२ मध्ये ८,९५० रुपये असलेला सरासरी दर २०२५-२६ मध्ये १४,८१६ रुपयांवर पोहोचला आहे.

त्यामुळे व्यापाऱ्यांना किंमत वाढीचा दिलासा मिळत असला तरी घटती आवक सांगलीच्या पारंपरिक बाजारपेठेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

उत्पादन घटल्याचा शेतकऱ्यांना फायदा
◼️ राजापुरी आणि पेरपेठ हळदीची आवक कमी झाल्याचा शेतकऱ्यांना मात्र चांगला फायदा झाला आहे.
◼️ प्रतिक्विंटल हळदीला १२ हजार ते २० हजार रुपयेपर्यंत दर मिळाला आहे.
◼️ सरासरी दरही १२ हजार रुपयेपेक्षा जास्तच राहिला आहे, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

राजापुरी हळदीची पाच वर्षांतील आवक
वर्ष / आवक (क्विंटल) / सरासरी दर

२०२१-२२ / १९,१३,४३५ / ८,९५०
२०२२-२३ / १४,७४,१३९ / ४,८२०
२०२३-२४ / ११,६१,३२५ / ९,०९०
२०२४-२५ / ९,४५,९२९ / १२,४७४
२०२५-२६ / ५,३७,६४६ /१४,८१६

परपेठ हळदीची पाच वर्षांतील आवक
वर्ष / आवक (क्विंटल) / सरासरी दर

२०२१-२२ / २,९३,१५५ / ६,१५०
२०२२-२३ / २,२५,५७५ / ३,८००
२०२३-२४ / २,८७,७२६ / ७,३००
२०२४-२५ / २,३५,५६८ / ११,५००
२०२५-२६ / १,७१,८१९ / १२,४४२

सातारा, मराठवाडा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून येणारी हळद कमी झाली आहे. जिल्ह्यातील क्षेत्रही घटले आहे. त्यामुळे आवक कमी झाली. मात्र, यंदा लागवड वाढल्याने पुढील काळात आवक वाढण्याची शक्यता आहे. - महेश चव्हाण, सचिव, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती

दोन वर्षांपूर्वी हळदीला खूपच दर कमी मिळत होता. म्हणूनच पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी हळद लागवड कमी केली. अन्य ठिकाणी बाजारपेठा तयार झाल्याने आवक घटली आहे. सध्या दर चांगले असल्याने पुढील वर्षी लागण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. बाजार समितीनेही आवक वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. - गोपाळ मर्दा, हळद व्यापारी, सांगली

अधिक वाचा: एल-निनोचा प्रभाव तरीही राज्यात मान्सून वेळेवरच येणार; वाचा जेष्ठ हवामानतज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज

Web Title : हल्दी उत्पादक किसानों को कम उत्पादन के बावजूद बढ़ी कीमतों से लाभ।

Web Summary : सांगली की हल्दी मंडी में आवक घट रही है। इसके बावजूद, बढ़ी मांग के कारण हल्दी की कीमतें अधिक हैं, जिससे कम उत्पादन के कारण किसानों को लाभ हो रहा है। हालाँकि, कम आवक सांगली के पारंपरिक बाजार के लिए खतरा है।

Web Title : Turmeric farmers benefit from increased prices despite reduced production.

Web Summary : Sangli's turmeric market faces declining arrivals. Despite this, increased demand has led to higher turmeric prices, benefiting farmers due to reduced production. However, the reduced inflow poses a threat to Sangli's traditional market.