Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला अखेर मंजुरी; आता 'या' १३ जिल्ह्यांतून जाणार हायवे

शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला अखेर मंजुरी; आता 'या' १३ जिल्ह्यांतून जाणार हायवे

The revised design of Shaktipeeth Highway has finally been approved; Now the highway will pass through these 13 districts | शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला अखेर मंजुरी; आता 'या' १३ जिल्ह्यांतून जाणार हायवे

शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला अखेर मंजुरी; आता 'या' १३ जिल्ह्यांतून जाणार हायवे

shaktipeeth expressway new route map नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाची सुधारित आखणी राज्य सरकारने प्रसिद्ध केली असून, आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

shaktipeeth expressway new route map नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाची सुधारित आखणी राज्य सरकारने प्रसिद्ध केली असून, आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाची सुधारित आखणी राज्य सरकारने प्रसिद्ध केली असून, आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तयारी सुरू केली आहे. या वर्षाअखेरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून महामार्गाच्या कामाला पुढील वर्षात सुरुवात करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे.

विदर्भाची थेट गोवा राज्याला जोडणी देण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील दिग्रज ते सिंधुदुर्गमधील बांदा असा ८५६ किमी लांबीच्या प्रवेश नियंत्रित महामार्गाची एमएसआरडीसीकडून उभारणी केली जाणार आहे.

हा महामार्ग एकूण १३ जिल्हे, ४० तालुके आणि ४०७ गावांमधून जाणार आहे. तर या महामार्गाच्या उभारणीसाठी १ लाख १ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी या महामार्गाच्या सुधारित आखणीला मंजुरी दिली होती. आता या महामार्गाचा आखणी सरकारने जाहीर केली असून, त्याची अधिसूचना जारी केली आहे.

त्यामुळे या महामार्गाचे भूसंपादन सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वीच्या आखणीनुसार असलेल्या १०७ गावांमधील जमिनींची संयुक्त मोजणी यापूर्वीच पूर्ण झाली आहे.

आता सुधारित आखणीमधील गावांची संयुक्त मोजणी सुरू केली जाणार आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी यातील बहुतांश कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. संयुक्त मोजणी पूर्ण होताच प्रत्यक्ष भूसंपादन केले जाणार आहे.

या वर्षाअखेर प्रकल्पाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. तर पुढील वर्षी प्रकल्पाचे काम सुरू केले जाईल, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
◼️ नागपूर ते गोवा हे अंतर २१ तासांवरून ८ तासांवर येणार.
◼️ १३ जिल्ह्यांतून मार्ग जाणार.
◼️ प्रकल्पात एकूण ६ बोगदे उभारले जाणार.

या जिल्ह्यातून मार्ग प्रस्तावित
वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे १३ जिल्हे जोडले जातील.

अधिक वाचा: भाडेपट्ट्याने शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पीककर्ज व विमा मिळणार; वाचा 'हे' नवीन परिपत्रक

Web Title : शक्तिपीठ राजमार्ग योजना स्वीकृत: राजमार्ग 13 जिलों से गुजरेगा

Web Summary : नागपुर-गोवा शक्तिपीठ राजमार्ग की संशोधित योजना स्वीकृत, 13 जिलों में भूमि अधिग्रहण शुरू। परियोजना का उद्देश्य यात्रा के समय को कम करना और कनेक्टिविटी को बढ़ावा देना है, भूमि अधिग्रहण और निविदा प्रक्रिया पूरी होने के बाद अगले साल निर्माण शुरू होने वाला है।

Web Title : Shaktipeeth Highway Plan Approved: Highway to Pass Through 13 Districts

Web Summary : The Nagpur-Goa Shaktipeeth Highway's revised plan is approved, initiating land acquisition across 13 districts. The project aims to reduce travel time and boost connectivity, with construction slated to begin next year after land acquisition and tendering are completed.